रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Vivo ची नवी चाल; परवडणाऱ्या किंमतीत Vivo G2 5G लाँच

विवोनं आपल्या जी सीरीजची सुरुवात केली आहे. यात कंपनीनं पहिला स्मार्टफोन Vivo G2 नवं होम मार्केट चीनमध्ये आणला आहे. डिव्हाइसमध्ये युजर्सना मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेट, ५०००एमएएचची बॅटरी, ८जीबी रॅम, २५६ जीबी पर्यंत स्टोरेज, ६.५ इंचाचा मोठा डिस्प्ले असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया डिवाइसचे फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.

Vivo G2 5G चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीनं Vivo G2 स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. जो ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६१२ x ७२० पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो. त्याचबरोबर वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सादर करण्यात आली आहे. हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित ओरिजन ओएस ३ वर चालतो.

फोनला पावर देण्यासाठी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोन ८जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६जीबी पर्यंत यूएफएस २.२ इंटरनल स्टोरेज सपोर्टसह येतो. इतकंच नव्हे तर डिव्हाइसमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.

कॅमेरा फीचर्स पाहता Vivo G2 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह सिंगल १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.पावर बॅकअपसाठी डिव्हाइसमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि १५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइलमध्ये ड्युअल सिम ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, ३.५मिमी हेडफोन जॅक असे फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी Vivo G2 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Vivo G2 5G ची किंमत

कंपनीनं Vivo G2 5G स्मार्टफोन ४ स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या ४जीबी रॅम व १२८जीबी व्हेरिएंटची किंमत १,१९९ युआन (सुमारे १३,९९८ रुपये) ठेवण्यात आली आहे. मोबाइलचा ६जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १,४९९ युआन (सुमारे १७,४९९ रुपये) मध्ये मिळतो. स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शनची किंमत १,५९९ युआन (सुमारे १८,८९९ रुपये) आहे. टॉप मॉडेलमध्ये ८जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज मिळते जो १,८९९ युआन (सुमारे २२,४४५ रुपये) मध्ये विकत घेता येतो. फोन डीप सी ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.

Source link

5g phonecheap 5g phonevivo g2 5gvivo phoneविवोविवो मोबाइलविवो ५जी फोन
Comments (0)
Add Comment