(फोटो सौजन्य : आयपीएस अनुकृती शर्मा इंस्टाग्राम)
कोण आहे अनुकृती शर्मा?
२०२० बॅचच्या आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा या राजस्थानमधील अजमेर शहरातील रहिवासी आहेत. त्यांची आई शिक्षिका होती, तर वडील २० पॉइंट विभागात काम करत होते. अनुकृतीने जयपूरच्या इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये जाऊन बीएसएमएसचे शिक्षण घेतले.
शिक्षण सुरू असताना अनुकृती बनारस येथील वैभव मिश्रा यांना भेटल्या आणि या दोघांमध्ये मैत्री घट्ट होत गेली. पुढे त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांची २०१२ मध्ये टेक्सासमधील ह्युस्टन येथील राइस युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी कार्यक्रमासाठी निवड झाली होती. वैभव यांनी अनुकृती यांना अमेरिकेला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याच्या घरच्यांनी त्याला आधी लग्न करण्याचा सल्ला दिला. परिणामी, २०१३ मध्ये त्या दोघांचे लग्न झाले.
अनुकृती यांनी पीएच.डी करत असताना, शिक्षणादरम्यान त्यांना अमेरिकेत नोकरीची ऑफर आली. नासाने ज्वालामुखींवर संशोधन करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघेही महिन्याला २ लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत होते. तथापि, काही काळानंतर त्या भारतात परतल्या. अनुकृतीने २०१४ च्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) परीक्षेत २३ वा क्रमांक मिळविला, तर तिचा पती वैभव मिश्रा ही या परीक्षेत अव्वल ठरले.
यानंतर अनुकृती आणि तिचा पती वैभव बनारसमध्ये राहून नागरी सेवांची तयारी करू लागले. अनुकृती आणि तिच्या पतीने यूपीएससीच्या तयारीदरम्यान एकमेकांना मदत केली.
अनुकृती आणि तिचा पती वैभव २०१५ मध्ये पहिल्यांदा परीक्षेला बसले होते. पण अनुकृती फक्त प्रिलिम पास करू झाल्या. त्याचवेळी तिला दुसऱ्या प्रयत्नात तर त्यांना प्रिलिमही पास होणे शक्य झाले नव्हते. यानंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात मुलाखत फेरी गाठली, पण तिला गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आले नाही.
२०१८ मध्ये, अनुकृतीची चौथ्या प्रयत्नात ३५५ वा क्रमांक मिळवून भारतीय महसूल सेवा (IRS) साठी निवड झाली. पण, आयपीएस होण्याचे त्यांचे ध्येय होते. म्हणून, २०२० मध्ये पाचव्यांदा यूपीएससीसाठी अर्ज केल्यानंतर, अनुकृती आयपीएस अधिकारी बनल्या. यानंतर, त्यांनी लखनऊमध्ये प्रशिक्षणार्थी आयपीएस म्हणून काम केले. IPS अनुकृती शर्मा आता बुलंदशहरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनुकृतीचे पती वैभव हे दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.