कायद्यानं बंदी असूनही गायी, बैलांची हत्या सुरूच; पाहा श्रीरामपूरमध्ये काय सापडलं?

हायलाइट्स:

  • श्रीरामपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
  • गोवंशाच्या जनावरांची चार हजार कातडी जप्त
  • तिघांना अटक; श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर: एकीकडे गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गायींना संरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गायी, बैल आणि वासरांची हत्या सुरूच आहे. श्रीरामपूरमध्ये गोवंशीय जनावरांची सुमारे चार हजार कातडी आढळून आली. याचाच अर्थ नजीकच्या काळात एवढ्या जनावरांची हत्या झाली आहे. (Police Seized leather in Shrirampur)

वाचा: सरकारी अधिकारी अजूनही फडणवीसांना भेटतात; पवार म्हणाले…

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. जैनबनगर परिसरात एका गोदामात गोवंशीय जनावरांची कातडी ठेवलेली असून ती वाहनात भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घातला. तेथून चांद पठाण, बबलू कुरेशी (दोघे रा. श्रीरामपूर) व हाजी मुस्ताक (रा. नगर) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सोळा लाख पाच हजार रुपयांची गोवंश जातीच्या जनावरांची कातडी व आयशर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी प्रक्रिया करून ही कातडी गोदामात साठवून ठेवली होती. विक्री करण्यासाठी नेण्याचा प्रयत्न सुरू असताना ते पकडले गेले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा: परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेलीय; पंकजांच्या नव्या ट्वीटची चर्चा

कायदा असला तरी नगर शहर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणावर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जाते. अनेकदा कारवाईत आरोपी पकडलेले जातात. मुद्देमाल जप्त होतो. जिवंत जनावारांची सुटका केली जाते. मात्र, हे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत. अनेकदा यासाठी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचीही साथ मिळत असल्याची चर्चा होते. जनावारांच्या कत्तलीचा या भागात मोठा व्यवसाय चालतो. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत जनावरे विकत घेतली जातात. त्यांची कत्तल करून मांसासोबत इतर प्रत्येक अवयावाचे वेगळे पैसे केले जातात. त्यातीलच कातडी हा एक भाग आहे. विविध वस्तू तयार करण्यासाठी या कातडीला मोठी मागणी असते. त्यामुळे जनावारांची कत्तल केल्यावर कातडीवर विशिष्ट प्रक्रिया करून ती साठवली जाते. श्रीरामपूरमध्ये हा व्यवसाय चालतो. त्यानंतर ती विकली जाते. श्रीरामपूरमध्ये जो साठा पकडला गेला, त्यामध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांच्या कातडीचा सामवेश आहे. त्यामुळे एवढ्या जनावरांची आधीच हत्या झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

वाचा: महाविकास आघाडीमागे ईडीचा ससेमिरा; पवारांचा सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा

Source link

AhmednagarLeather Seized in ShrirampurShrirampurअहमदनगरश्रीरामपूरश्रीरामपूरमध्ये जनावरांची कातडी जप्त
Comments (0)
Add Comment