दोन चिमुकले गुरे चरवण्यासाठी गेले; जनावरे परत आली, मात्र मुलं परतली नाही, शेततळ्यावर पाहताच…

परभणी: जनावरे चारण्यासाठी गेलेली दोन मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेततळे भागात गुरुवार १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मयत दोन्ही मुले सायाळा खटींग येथील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
जिवंतपणीच स्वत:चं तेरावं घातलं, २४ तासांत मृत्यूनं गाठलं; मनातली कुशंका निधनानंतर खरी ठरली
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा बालासाहेब पौळ (१४), ओम बाबुराव कंधारे (१४) असे मयत मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले गुरुवारी पशुधन घेऊन त्यांना चारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेली होती. सायंकाळच्या सुमारास जनावरे परत आली. मात्र मुले सोबत नव्हती. ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेतला. वनामकृवीतील शेततळे भागात कृष्णा पौळ याचा मृतदेह आढळून आला. तर ओम दिसून आला नाही. कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. शेततळ्यात ओमचा शोध घेण्यात आला.

१८००० किलो वजनाची हनुमान कढई, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बनणार ७००० किलो महाप्रसाद

शुक्रवार १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ओम कंधारे याचा मृतदेह मिळून आला. शहर महानगरपालिका अग्निशमनचे गौरव देशमुख, संतोष पोंदाळ, मदन जाधव यांनी शोध मोहीम राबवली. घटनास्थळी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब भिसे यांची उपस्थिती होती. या घटनेत मयत कृष्णा पौळ हा एकुलता एक मुलगा होता. तर ओम कंधारे याला एक लहान भाऊ आहे. दोन्ही मुले शाळेत शिकत होती. मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Source link

children drownedchildren drowned in farmparbhani newsपरभणी बातमीमुलांचा बुडून मृत्यूमुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
Comments (0)
Add Comment