नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी पकडला सोळा किलो गांजा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

म. टा. प्रतिनिधी, येरवडा/पुणे: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी सोळा किलो गांजा पकडून दिला. पानटपरीत किंवा अन्य दुकानांमध्ये ‘बडीशेप’ची किरकोळ विक्री होते, त्याप्रमाणे संबंधित शैक्षणिक संस्थेबाहेर गांजाची विक्री करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी या प्रकरणी एकाला पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

अजय सोपान सावंत (वय ५१, रा. टिंगरेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार गणेश मधुकर वाळुंजकर हा फरार आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी शैलेश नाईक यांनी तक्रार दिली आहे. नवीन विमानतळ रस्त्यावर संजय पार्क मधील एका मोकळ्या जागेतील खोलीत एक जण अमली पदार्थ बाळगून विक्री करत असल्याची माहिती आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी विमानतळ पोलिस ठाणे गाठून गांजा विक्रीची माहिती पोलिसांना दिली.

उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, आडम मास्तरांचा घोळ, म्हणाले फडणवीसांच्या जोडीने नाव तोंडात बसलं

पत्र्याच्या खोलीत गांज्याची पोती

त्यानतंर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे, संगीता माळी,सहायक निरीक्षक विजय चंदन आणि उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे आणि कर्मचारी व पक्षाचे कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका पत्र्याच्या खोलीत आरोपी सावंत याच्याकडून भरलेले पोते सापडून आले. पोलिसांनी पंचाच्या समक्ष पोते उघडल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा सापडून आला. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीला अटक केली. जप्त केलेला गांजा सोळा किलो असून, गांजाचा मालक फरार झाला आहे. आरोपी मिळाल्यावर यासंबंधीची अधिक माहिती मिळ‌ू शकेल. तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.


‘नागरिकांना कळते; पोलिसांना का नाही?

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी एका मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकल्याचा प्रकार ताजा असतानाच विमाननगर येथे नागरिकांनी गांजा विक्री पकडून दिल्याने पोलिसांकडून या प्रकारांकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमाननगर परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सजग लोकांनी पकडून दिल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अटक टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याकडून ५० लाखांची मागणी, १५ लाख रुपये घेताना पोलीस कॉन्स्टेबलला बेड्या

कोट

एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यावर विमानतळ पोलिसांनी विमाननगर परिसरातून सोळा किलो गांजा पकडला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

– विजय मगर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार

परळीत कडकडीत बंद; महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, पोलिसांविरोधात व्यापारी एकवटले

Source link

Pune crimePune newspune vimannagar newsअमली पदार्थपुणे न्यूजपुणे पोलीस
Comments (0)
Add Comment