म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भाजपकडून सुरू असलेला मनमानी कारभार आणि आदिवासी राष्ट्रपतींनाही अयोध्येतील सोहळ्यापासून दूर ठेवल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी शनिवारी (दि. २०) श्री काळाराम मंदिर येथे प्रतीकात्मक महाआरतीचा निर्णय घेतला आहे.
अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये त्याच दिवशी श्री काळाराम मंदिरात दर्शन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी सुरू असतानाच काँग्रेसने त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काळारामाचे दर्शन घेऊन मंदिराची स्वच्छता केली होती. राम मंदिराचे श्रेय शिवसेनाही घेते. त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिवसेनेनेही काळाराम मंदिर येथे महाआरती करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली असून, त्यांनी संपूर्ण नाशिकची सजावट करण्याचा, तसेच ठिकठिकाणी पक्षाचे होर्डिंग लावण्यासह रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप व ठाकरे गटातील राजकीय स्पर्धा चर्चेत असतानाच आता त्यामध्ये काँग्रेसने उडी घेतली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी आपल्या पत्राद्वारे शनिवारी (दि. २०) काळाराम मंदिर येथे महाआरतीचा निर्णय घेतला आहे. या मंदिराला असलेले ऐतिहासिक महत्त्व, अयोध्या येथील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला ऐतिहासिक सत्याग्रह हे सर्व लक्षात घेत महाआरतीचेआयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Maharashtra News And Marathi News