तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा, नकार देताच चौघांचा तरुणीच्या पित्यावर हल्ला, काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मुलीचे वय कमी असल्याने तिच्या लग्नाला नकार देणाऱ्या पित्यावर चौघांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना भंडारा शहराजवळील बैलबाजारात घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हुरहुरसिंग राजपूत रा. पटेरा (कटनी), असे जखमीचे नाव आहे. राजपूत हे कुटुंबीयांसह बैलबाजार परिसरात रुद्राक्ष विक्री करतात. घटनेच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास कंठीलाल अय्या पवार (५०), बादशाह कंठीलाल पवार (२२), जोमसलाल कंठीलाल पवार (२४), अनसूर कंठीलाल पवार (३०) रा. पटेरा (कटनी) हे त्यांच्या घरी आले. तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा, असे म्हटले. यावर राजपूत यांनी ‘माझ्या मुलीचे वय कमी असल्याने आम्ही लग्न करणार नाही’ असे सांगितले. यावरून आरोपींनी भांडण केले आणि शिवीगाळ करून निघून गेले. थोड्या वेळानंतर आरोपी पुन्हा त्यांच्या घरी आले व शिवीगाळ सुरू केली. त्यातील कंठीलाल पवार याने राजपूत यांच्या डोक्यावर बांबूच्या काठीने हल्ला करून जखमी केले.

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने स्वत:ला संपवलं, ‘त्या’ सांकेतिक शब्दामुळे लागला माग; महिन्यानंतर प्रकरणाचा उलगडा

याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

परळीत कडकडीत बंद; महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, पोलिसांविरोधात व्यापारी एकवटले

Source link

bhandara crimebhandara newsbhandara policecrime newsक्राईम न्यूजभंडारा न्यूजभंडारा पोलीस
Comments (0)
Add Comment