उल्हासनगरमधील भाजप नेत्यांच्या हत्येचा कट, कटात गोवण्याचा प्रयत्न असल्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: उल्हासनगर शहरातील भाजपच्या माजी जिल्ह्याध्यक्षासह इतर दोन लोकप्रतिनिधींच्या हत्येचा कट आखल्याबाबतचे पत्र विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी उल्हासनगर पोलिस उपायुक्तांना दिले आहे. या हत्या मी घडवून आणणार असल्याचा कट आखत यात मला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही रामचंदानी यांनी केला आहे.

भाजपाचे वादग्रस्त माजी नगरसेवक आणि उल्हासनगरचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी उल्हासनगर पोलिस उपायुक्त यांना एक पत्र पाठवले. मला मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीस २५ लाख रुपयांची सुपारी देऊन उल्हासनगरमधील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, महेश सुखरामनी आणि अमित वाधवा यांच्यावर गोळीबार करण्यात येणार आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. हा हल्ला माझ्या सांगण्यावरून करण्यात आला अशी खोटी साक्ष अज्ञात व्यक्ती पोलिस ठाण्यात देणार असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे. रामचंदानी यांच्या पत्राने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी सर्वांची नार्को चाचणी करण्यात यावी. यानंतर सत्य समोर येईल. केवळ पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार होत आहे, अशी प्रतिक्रिया अमित वाधवा यांनी दिली. तर याबाबत मी आमदार कुमार आयलानी यांच्यासोबत पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेत तात्काळ योगत तो तपास करण्याची मागणी केली असल्याचे जमनू पूरस्वानी यांनी म्हटले आहे.

Pune Accident: आयशर चालकाला डुलकी, तेवढ्यात अनर्थ घडला, समोरच्या वाहनाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

या प्रकरणी साहाय्यक पोलिस आयुक्तांना सखोल चोकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी सांगितले.

Source link

bjp leaders murder complaintpredeep ramchandaniThane newsulhasnagar newsulhasnagar policeठाणे न्यूजमहाराष्ट्र भाजप
Comments (0)
Add Comment