विद्यापीठाच्या या १४ परीक्षा पुढे ढकलल्या :
दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पुढे ढकलण्यात आलेल्या सकाळच्या सत्रातील बी.कॉम. सत्र ५ , एमए पब्लिक पॉलिसी सत्र ३, एमए राज्यशास्त्र सत्र १, एमएस्सी रिसर्च सत्र १ या चार परीक्षा आहेत.
तर दुपारच्या सत्रात बीएमएस – एमबीए ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र १, तृतीय वर्ष बीए सत्र ५, प्रथम वर्ष एलएलबी – जन. एलएलबी ( ३ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र १, प्रथम वर्ष एलएलबी – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र १, एलएलबी ( ३ वर्षीय अभ्यासक्रम, ७५:२५) सत्र १, बीए एलएलबी ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, ७५:२५) सत्र १, प्रथम वर्ष एलएलबी – जन. एलएलबी ( ३ वर्षीय अभ्यासक्रम, ६०:४० ) सत्र १, प्रथम वर्ष एलएलबी – बीएलएस ( ५ वर्षीय अभ्यासक्रम, ६०:४०) सत्र १, एमएसडब्ल्यू सत्र ३, एमएस्सी रिसर्च सत्र ३ या १० परीक्षा आहेत. या १४ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांची सुधारित तारीख दिनांक ३१ जानेवारी २०२४ आहे.
आयडॉलच्या ३ परीक्षा पुढे ढकलल्या :
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
यातील प्रथम वर्ष बीए सत्र १ व प्रथम वर्ष बीकॉम सत्र १ या परीक्षा २२ जानेवारी ऐवजी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी व एमएमएस सत्र २ ची परीक्षा २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.