आरक्षणाच्या मागणीसाठी जाणाऱ्या मराठा बांधवाच्या मार्गावर मुस्लिम समुदायाकडून फुलांचा वर्षाव

सोलापूर: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराठी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधवानी सायंकाळी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा बांधव मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळताच मुस्लिम समुयदायाने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जाणारे मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक असा एक किलोमीटर पायी प्रवास केला.
तुम्हाला खरचं मोदी आणि भाजपला हरवायचे का ? प्रकाश आंबेडकरांचा मविआला सवाल अन् इशारा म्हणाले आम्ही ४८ जागा…
शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मुस्लिम बांधवांनी एक किलोमीटरपर्यंत गुलाबाचा रस्ता तयार केला होता. राज्यातील सर्व मराठा बांधवासोबत मुस्लिम समुदाय खंबीरपणे पाठीशी असल्याची माहिती दिली. शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत मुंबईला जात आहेत. मुस्लिम समुदाय मराठा बांधवांच्या पाठीशी असल्याची माहिती दिली.

सोलापुरातील एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाला संपूर्ण पाठिंबा दिला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधव शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजी महाराज पुतळ्याकडे पायी निघाले. फारूक शाब्दी आणि एमआयएमचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मराठा बांधवासोबत पायी मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक असा पायी चालत मराठा समाजाला व त्यांच्या सर्व मागण्यांना पाठिंबा देत असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली.

उद्धव ठाकरेंनी आपण कुणाचे पुत्र आहोत हे ध्यानात ठेवावं; राम मंदिरावर राजकारणावर योगेश कदमांची प्रतिक्रिया

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधव मनोज जरांगेच्या मागणीला जबरदस्त पाठिंबा देत सोलापूरहुन निघाले आहेत. सोलापूर शहर आणि सर्व तालुक्यातील मराठा बांधव माऊली पवार, दिलीप कोल्हे, अमोल बापू शिंदे, पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघाले आहेत. पुणे पर्यंत मराठा बांधव वाहनाने जातील आणि पुढं मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहभागी होतील, अशी माहिती माऊली पवार यांनी दिली.

Source link

maratha reservation movementmaratha reservation newssolapur newsमराठा आरक्षण आंदोलनमराठा आरक्षण बातमीसोलापूर बातमी
Comments (0)
Add Comment