Mumbai Marathon: वारा होऊनी धावणार मुंबई, आज पहाटे ५पासून मुंबई मॅरेथॉनची धाव

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : थंड, गारेगार अशी मुंबईची पहाट… वरळी सी-लिंकवर पडणारी वेगवान पावले आणि ‘हर दिल मुंबई’ नाऱ्यासह दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवरील धावपटूंचा उत्साह… आज, २१ जानेवारीला मुंबईत असे जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’चे. अवघी मुंबापुरी या स्पर्धेसाठी सज्ज झाली असून, पहाटे ५ वाजल्यापासून मुंबईकर यात धावणार आहेत.

यावर्षीही फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन, सीनिअर सिटिझनसह विविध विभागांत ही स्पर्धा होणार आहे. मुंबईकरांना आपलीशी वाटणाऱ्या या मॅरेथॉनची सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असते. यात अनेक नामवंत, सेलिब्रिटी उत्साहाने सहभागी होतात. यावेळीही विशेष उपस्थिती म्हणून उद्योगपती अनिल अंबानी धावणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आदी अधिकारीही यात सहभागी होणार आहेत.

हर्षली अयोध्यानगरी ! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फुलांची आरास अन् दिव्यांची रोषणाई
मुंबई मॅरेथॉन आणि नामवंत कलावंत हे तसे जुनेच समीकरण आहे. यंदा गीतकार गुलजार या स्पर्धेत धावणार आहेत. सागरिका घोष आणि मॉडेल-अभिनेता राहुल बोस ही मंडळीही मॅरेथॉनमध्ये दिसणार आहे. तर, ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवणारी धावपटू क्रांती साळवेचा सहभाग स्पर्धेचा उत्साह वाढवणार आहे. मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’मध्ये धावपटूंना त्यांचे वेगळेपण दाखवता येणार आहे. इमॅजिकाच्या ‘रन इन कॉस्च्युम’ स्पर्धेत धावपटूंना त्यांच्यातील ‘पॉप आयकॉन’ सादर करण्याची संधी आहे. वंडर वुमन, जवान (सोल्जर) किंवा आवडीच्या कोणत्याही पात्राच्या वेशभूषेत स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यात ‘मुंबईज रन इन कॉस्च्युम चॅम्पियन’ असा किताब जिकंण्याची त्यांना संधी आहे.

यंदा ‘व्हर्च्युअल रन’

‘व्हर्च्युअल रन’ हे यंदाच्या मॅरेथॉनचे वेगळेपण आहे. या माध्यमातून ‘टीएमएम अ‍ॅप’द्वारे दोन हजार ९०० धावपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ते मॅरेथॉनच्या दिवशी दक्षिण मुंबईत नव्हे, तर आपापल्या शहरात धावणार आहेत. अशा पद्धतीने सर्वसामान्यांपासून ते विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसणार आहेत.

शीव रेल्वे उड्डाणपुलाबाबत महत्त्वाची घडामोड, चार दिवस पुलावरून वाहतूक सुरूच राहणार; कारण…

Source link

aapli mumbai newsmumbai marathi newsmumbai marathonआपली मुंबई बातम्यामुंबई मराठी बातम्यामुंबई मॅरेथॉन
Comments (0)
Add Comment