मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यास उत्सुक आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजीच्या या सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती ‘एक्स’ वरुन दिली आहे.

अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली आहे.

राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
कोणाला कोणाला निमंत्रण

या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल सात हजारांहून अधिकजणांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून अमिताभ बच्चन यांसारखे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाला घेऊन रामलल्लाच्या दर्शनाला कधी जाणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.

टाटा मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; मुख्यमंत्र्यांसह इतर नेतेही उपस्थित

Source link

Eknath Shindemumbai newsram templeram temple consecrationram temple inaugrationएकनाथ शिंदेमुंबई न्यूजराम मंदिरराम मंदिर प्राणप्रतिष्ठा
Comments (0)
Add Comment