हायलाइट्स:
- भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघड.
- आगामी महापालिका निवडणुकीत आरोपीचा भाऊ निवडून यावा म्हणून रचला हत्येचा कट.
- याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्ष (भाजप) चे नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आरोपीचा भाऊ निवडूण यावा म्हणून हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Conspiracy to assassinate corporator Dheeraj Ghate exposed)
विकी उर्फ वितुल वामन क्षीरसागर , मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर, आंबीलओढा कॉलनी), महेश आगलावे (रा. लोहीयानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेह नगर, निलायम टॉकीजजवळ) यांनी तक्रार दिली आहे. नवी पेठेतील शेफ्रॉन हॉटेल येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास परिसरात ही घटना घडली.
क्लिक करा आणि वाचा- ‘करोनाची तिसरी लाट येणार नाही, आलेली आहे’; महापौरांचे मुंबईकरांना ‘हे’ आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ म्हणून घाटे हे नगरसेवक म्हणून निवडूण आले आहेत. तसेच, ते भाजपमध्ये विविध पदावर काम केले आहे. शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी येथील शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना तीन व्यक्ती काळी बॅग घेऊन हॉटेलमध्ये आल्याचे दिसले. तसेच, ते त्यांच्याकडे सतत पाहत होते. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांना चौकशी केली. त्यावेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी ते काही तरी बोलत असल्याचे समजले. तसेच, त्यांच्याकडे काही तरी शस्त्र असल्याचे समजले. त्यामुळे ते त्या ठिकाणाहून निघून गेले.
क्लिक करा आणि वाचा- औरंगाबादमध्ये पावसाचा कहर! अनेक वसाहती जलमय, हजारो घरांमध्ये पाणी शिरले
क्षिरसागर हा घाटे यांच्या पूर्वी कार्यकर्ता होता. पण, पाच वर्षापासून तो त्यांच्यासोबत राहत नाही. त्याचा भाऊ दुसऱ्या पक्षात गेला आहे. त्यामुळे घाटे यांचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर संपर्क ठेवत नाहीत. त्याने आमिष दाखवून कार्यकर्त्यांना त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण, ते त्याच्यासोबत गेले नाहीत. म्हणून तो चिडून होता. येत्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडून यावा म्हणून त्याने साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचला होता. त्यासाठी तो घाटे यांच्यावर शेफ्रॉन हॉटेलमध्ये हल्ला करण्यासाठी आला होता.
क्लिक करा आणि वाचा- अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री कडाडले
याबाबत घाटे यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर खात्री पटली, असे घाटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घाटे यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.