Video : बैलगाडी प्रेक्षकांमध्ये शिरल्यानं चिमुकली जखमी, तिला खांद्यावर घेत पोलीस कर्मचारी धावला अन् जीव वाचवला

रत्नागिरी: बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीनं वादाचा ठरला आहे. बैलगाडी स्पर्धा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या. हेदली येथे या बैलगाडी स्पर्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने भरवल्या होत्या. मात्र, बैलगाडा उधळल्याने जखमी झालेल्या एका मुलीचा जीव पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला आहे. तर, या स्पर्धेत चार जण अजून जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. खेड पोलीस ठाण्यातील संपत गीते या कर्मचाऱ्यानं या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. खेड तालुक्यातील हेदली येथे बैलगाडी स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात आली होती. बैल गाडी सपर्धा सुरू असताना तिस-या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या गॅलरीत घुसल्याने हा सगळा मोठा अनर्थ घडला.

खेड तालुक्यातील हेदली गावात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोकण केसरी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेत बैलगाडी हातातून सुटला आणि प्रेक्षकांमध्ये उभे असलेल्या पाच वर्षाच्या लहान मुलीच्या अंगावर गेल्याने ती जखमी झाली. यावेळी एका पोलिसाने तिला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल ला घेऊन गेला. मात्र, सदरच्या बैलगाडी स्पर्धेत त्या मुलीसह पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बुरे दिन, १ लाख कोटी बुडाले, एलआयसीला अच्छे दिन, या कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं

बैलगाडा शर्यतीत बैल उधळल्यामुळे प्रेक्षक गॅलरीत शिरला. प्रेक्षकांमधील एका लहान चिमुरडीसह चार जण जखमी झाली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हेदली या गावात आयोजित स्पर्धेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या झालेल्या घटनेत लहान मुली सह ४ जण जखमी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून त्यामध्ये ५ जखमी झाले. अचानक बैल प्रेक्षक गॅलरीत शिरल्याने एकाच गोंधळ उडाला होता.
महाराष्ट्राच्या जनतेच्या पैसा खर्च करुन मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ दावोसहून परतलं:अंबादास दानवेंचा हल्लाबोल
दरम्यान, यावेळी पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या संपत गीते या कर्मचाऱ्यानं त्या मुलीला घेऊन धावत जाऊन तिचा जीव वाचवला.
वेध लोकसभा निवडणुकीचा : मविआचं ठरलं, महायुतीत कन्फ्यूजन, ‘यशवंत’ विचारांचा सातारा लोकसभेला काय करणार? Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Bullock Cart Raceratnagiri latest newsRatnagiri newsratnagiri policeSampat Giteबैलगाडा शर्यतरत्नागिरी पोलीससंपत गीते
Comments (0)
Add Comment