धनाजी चव्हाण, परभणी : मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. त्याचबरोबर मयतासोबत पार्टनरशिप मध्ये ट्रॅक्टरही घेतले होते. दोघेजण मिळून व्यवसाय करत असतानाच वडिलांना दिलेल्या उसण्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर खुनात झाले आहे. मयताचे नाव हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख (वय २३, रा. पेडगाव ता. जि. परभणी) असं आहे. तर आरोपीचे नाव शेख उमर शेख रसूल (वय ३८, रा. पेडगाव ता. जि. परभणी) असं आहे.
१६ जानेवारी रोजी परभणीच्या पारवा शिवारामध्ये एक मानवी सांगाडा असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान खून, घातपात दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षक रगसुधा आर. यांनी तात्काळ आरोपीचा शोध आणि मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली.

त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरील गुन्हा आरोपी शेख उमर शेख रसूल याने केला असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना कळाली. तसेच हा मानवी सांगाडा परभणीच्या पेडगाव येथील रहिवासी हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख याचा असल्याचे देखील निष्पन्न झाले. आरोपी शेख उमर शेख रसूल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले.
गुन्ह्याचे कारण विचारले असता आरोपी शेख उमर शेख रसूलने सांगितले की, “मी आणि अल्ताफ शेख दोघेजण मिळून पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतले होते. त्याचबरोबर त्याच्या वडिलांना मी दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. उसने दिलेले पैसे परत मिळत नव्हते आणि त्यामुळेच दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याचा खून केला” असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.