धक्कादायक! उपचाराच्या बहाण्याने जवळीक, ५० वर्षीय भोंदू महाराज २२ वर्षीय तरुणीला घेऊन पसार

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो, असे तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले ते परत आलेच नाही. शेवटी वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे. प्रकाश नाईक महाराज (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. काही दिवसानंतर तिच्या लहान बहिणीलाही त्रास होऊ लागला. दरम्यान, गावातील एकाने मुलींच्या वडिलांना तुम्ही सावरगाव काळे येथील प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी महाराजाकडे नेले. महाराजांनी उपचारदरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले.

सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याची बतावणी, परीक्षा न देताच भरती करण्याचे आमिष, तरुणांना लाखोंचा गंडा

मुली व तिच्या वडिलांना अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडी येथे जत्रेला घेऊन गेला. त्यामुळे महाराज व मुलीच्या कुटुंबात जवळीक निर्माण झाली. १० जानेवारीला रात्री १२च्या दरम्यान प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले. लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून २२ वर्षीय तरुणीला आपल्यासोबत नेले. मात्र त्यानंतर महाराज परत आलेच नाही. मुलीच्या वडिलांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल बंद आढळला. लाखनवाडी येथे जाऊन महाराज व मुलीचा शोध घेतला. पण ते दिसले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीच्या वडिलांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक करीत आहे.

दारू विक्री आणि सेवन बंद करा, नाही तर गावातून धिंड काढण्याची पोलिसांकडून तंबी

Source link

crime newsfarud maharajner police stationyavatmal newsक्राईम न्यूजनेर पोलीस स्टेशनमहाराष्ट्र पोलीसयवतमाळ न्यूज
Comments (0)
Add Comment