अयोध्येवारीसाठी महाराष्ट्रातून धावणार स्पेशल ट्रेन्स; ४८ लोकसभा क्षेत्रांतून ४ हजार प्रवाशांना सुविधा

मुंबई: बालरूपातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि राममंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर राज्यातील नागरिकांना अयोध्यावारीसाठी सशुल्क विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाजपच्यावतीने राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रांतील नागरिकांना सशुल्क अयोध्यावारी घडवण्यात येणार आहे. आज, २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत बालरूपातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी रामलल्लाचे दर्शन खुले होणार आहे. सर्वसमान्यांना राम मंदिराच्या दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयाने अयोध्यावारीसाठी विशेष एक्स्प्रेसची व्यवस्था केली आहे.

राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्रातून चार हजार नागरिकांना अयोध्यावारी घडवण्यात येणार आहे. सोमवारी, २९ जानेवारीला भाविकांसह पहिली रेल्वे अयोध्येसाठी रवाना करण्यात येणार असून मार्चपर्यंत विशेष रेल्वेगाड्या सुरू राहणार आहेत. अयोध्यावारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून एक हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. यात मुंबई-अयोध्या-मुंबई असा रेल्वे प्रवास, अयोध्येत राहण्याची-जेवणाची व्यवस्था आणि रामलल्लाचे दर्शन यांचा समावेश आहे, असे प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय यांनी सांगितले. मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष रेल्वेगाडीच्या सूटण्याच्या वेळाबाबत विचारले असता, अद्याप विशेष रेल्वेगाडीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रामलल्ला मूर्तीच्या अभिषेकासाठी १ मिनीट २४ सेकंदाचा शुभ मुहूर्त; वाचा अयोध्या कार्यक्रमाचे वेळापत्रक
मुंबईतील लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे येथून रवाना होतील. नाशिक, पुणे, नागपूर अशा रेल्वे स्थानकांतून संबंधित लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या धावणार आहेत, असे ही संजय पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Ayodhya railway stationayodhya ram mandir inaugurationAyodhya Ram mandir Pran Pratishtha Ceremony Liveayodhya trainayodhya verdictmumbai newsSanjay Pandeyspecial train for ayodhyaअयोध्या विशेष एक्स्प्रेसअयोध्या विशेष रेल्वे
Comments (0)
Add Comment