पुणे : ८ व्या मजल्यावर कपडे वाळत घालताना महिलेचा स्टूलवरून घसरला पाय आणि…

हायलाइट्स:

  • आठव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू
  • कपडे वाळत घालत असताना घसरला पाय
  • महिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळ

पुणे : स्टूलवर उभे राहून कपडे वाळत घालत असताना इमारतीच्या आठव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी आंबेगाव खुर्द परिसरातील लेकवूड सोसायटीत घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तेत्रीदेवी हरिजी सिंग (वय ५६, रा. लेकवुड सोसायटी, आंबेगाव खुर्द) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेत्रीदेवी या मूळच्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात नोकरीला आहे. त्यामुळे ते आणि सून आंबेगावतील लेकवूड सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहतात. तेत्रीदेवी यांच्या पतीची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत मुलगाही मुंबईत थांबलेला आहे. या कारणास्तव काही दिवसांपूर्वीच तेत्रीदेवी या सूनेसोबत राहण्यास आल्या होत्या.

‘…तर मी नोकरी सोडणार’; तरुणाच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षकांचा ग्रामस्थांना शब्द

तेत्रीदेवी या मंगळवारी सकाळी लवकर उठल्या. धुतलेली कपडे त्या स्टूलवर उभ्या राहून गॅलरीत वाळू घालत होत्या. त्यावेळी स्टूलवरून त्यांचा तोल गेल्यामुळे त्या थेट आठव्या मजल्याच्या गॅलरीतून खाली पडल्या.

खाली मोठा आवाज आल्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ तिकडे धाव घेतली. त्यावेळी तेत्रीदेवी या सोसायटीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी गॅलरीची पाहणी केली असता त्या ठिकाणी स्टूल व कपडे असल्याचं दिसून आलं. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source link

Punepune news live updatesPune Policeपुणे न्यूजपुणे पोलीस
Comments (0)
Add Comment