मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठाम, जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन थांबवण्याचे आवाहन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ठाम असून, त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून युद्धपातळीवर डेटा संकलन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल,’ अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. त्यांच्या या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी झाले असून, हे आंदोलन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी पुन्हा जरांगे यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले.

अयोध्येवारीसाठी महाराष्ट्रातून धावणार स्पेशल ट्रेन्स; ४८ लोकसभा क्षेत्रांतून ४ हजार प्रवाशांना सुविधा

‘मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असताना जरांगे यांनी आंदोलनाचा मार्ग धरू नये. कारण अशा आंदोलनाने नागरिकांना त्रास होणार आहे. त्यांनी आंदोलन स्थगित करावे.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अहमदनगर पॅक; मनोज जरांगेंचं भगवं वादळ जोमात

Source link

Eknath Shindemanoj jarangeMaratha Reservationmaratha reservation mumbai marchmumbai newsमनोज जरांगेमराठा आंदोलनमराठा आरक्षणमुंबई न्यूजमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment