राम जन्मभूमी अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजघराण्याची परंपरा असलेल्या करवीर युवासीनी आई अंबाबाई मंदिरातील रामाचा पार परिसरात असलेल्या राम मंदिरात कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराणी याज्ञसेनीदेवी, माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती उपस्थित होते.
कोल्हापूरचे राजघराणे आणि जनतेच्या प्रेमाचे नाते कित्येक पिढ्यांपासूनचे आहे. छत्रपतींच्या आताच्या पिढीनेही हा जिव्हाळा जपला असून पुर्वापार सुरू असलेल्या सर्व परंपरा आजतागायत कोल्हापुरात सुरू आहेत. त्याच परंपरेत अंबाबाई मंदिर परिसरातील श्री राम मंदिराची व्यवस्था छत्रपती घराण्यामार्फत करण्यात येते, राम मंदिरालगतच्या वडाच्या पारावर शेकडो वर्षापासून किर्तन-प्रवचन सोहळे साजरा केले जातात, राम मंदिरामुळेच या ठिकाणाला रामाचा पार असे नाव पडले आहे.
प. पु. श्रीधर स्वामी, टिल्लू शास्त्री, कळमकर शास्त्री, डा. शंकर अभ्यंकर, बाबा महाराज सातारकर अशा प्रसिद्ध किर्तनकार – प्रवचनकारांनी या ठिकाणी सेवा दिली आहे. श्री सिद्धीविनायक सांस्कृतीक मंडळातर्फे पुर्वी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असत. तत्कालीन छत्रपती शहाजीराजे उर्फ आबासाहेब महाराज यांच्या काळात जयपूर येथून आलेल्या महान संतांनी हत्तीवरुन राम, सीता, लक्ष्मणची संगमरवरी मूर्ती कोल्हापूरात आणली होती. या मूर्ती वडाच्या पाराजवळ मंदिर बांधून मूर्ती स्थापीत केल्या. दक्षिणेकडे तोंड असलेल्या या मूर्तीसमोर हनुमंताचे मंदिर आहे. छत्रपतींनी हरीभट नरहरी झुरळे यांची तिसरी पिढी मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे.
शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी राम नवीन नाहीये अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय छत्रपती घराण्यात आजपर्यंत ४ छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आले आहे. यावरूनच या घराण्याची रामभक्ती दिसून येते असेही ते म्हणाले. राम मंदिर होतंय हा आनंदाचा क्षण आहे असे सांगत मी १९५६ साली आपण ८ वर्षांचा असताना अयोध्येत गेलो होतो त्यानंतर जाण्याचा योग आला नाही आता भविष्यात आला तर नक्की जाईन असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात अभूतपूर्व उत्साह
अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे, कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर दीडशे बाय दीडशे फुटांची पण त्यांची रांगोळी साकारण्यात येणार आहे तर आज सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीची महाआरती करण्यात येणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News