राम मंदिरासह VVIP लोकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या स्थरावर तयारी करण्यात आली आहे. यासाठी AI टेक्नॉलॉजी सह १० हजार CCTV कॅमेरे आणि ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला राम मंदिराच्या सुरक्षेत वापरण्यात आलेल्या हाय-टेक सिक्योरिटीची माहिती देणार आहोत.
AI ड्रोन आहेत लक्ष ठेवून
PTI नं एका पोलीस अधिकाराच्या हवाल्याने माहिती दिली आहे की अयोध्येत नजर ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटीलीजेंस (AI) असलेल्या ड्रोनची मदत घेतली आहे. त्याचबरोबर अँटी माइन ड्रोनचा देखील वापर करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की AI ड्रोन संपूर्ण अयोध्येवर पाळत ठेवतील. त्याचबरोबर अँटी माइन ड्रोन ग्राउंडवर देखील लक्ष ठेवून असतील, ज्यामुळे संभाव्य स्फोट टाळता येतील.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीनपासून १ मीटरच्या उंचीवरून उडणारे अँटी माइन्स ड्रोन अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह येतात. यात स्पेक्ट्रोमीटर वेवलेंथ डिटेक्शन आहे, ज्यामुळे जमिनीत लपलेले स्फोटक पदार्थ डिटेक्ट करता येतील.
AI आधारित टेक्नॉलॉजीचा वापर
संपूर्ण अयोध्या जिल्ह्यात १० हजार CCTV कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. यातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत AI आधारित टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात काटेरी तारांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. यामुळे VVIP मुव्हमेंट नियंत्रित करण्यास मदत होईल.
२५ हजारांहून अधिक पोलिस, एनएसजी कमांडो
अयोध्येत २५ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये केंद्रीय पोलिसांचाही समावेश आहे. विमानतळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असणारा मार्ग ‘एसपीजी’च्या निरीक्षणाखाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्याची खात्री केली