या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट म्हणजे, बीटेक (B. Tech) आणि बीईचा (BE) पेपर आता २७, २९, ३०, ३१ आणि १ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. बीआर्क (B.Arch) आणि बीप्लानिंगचा पेपर हा २४ जानेवारीला होणार आहे.
कसे डाउनलोड कराल प्रवेश पत्र…?
1. सर्वात अगोदर jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. Download Admit Card B.Arch / B.Planning वर क्लिक करा.
3. तिथे एक लिंक दिसेल.
4. तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख आणि तुमचा पासवर्ड टाका.
5. त्यानंतर लाॅगिंन करा.
6. तिथेच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसले.
7. ते डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.
परीक्षेसाठी महत्वाच्या सुचना :
1. परीक्षेत कोणीही काॅपी करताना आढळल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेस बसू दिले जाणार नाही. शिवाय, त्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
2. टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल.
3. बायोमेट्रिक सिस्टमधून परत विद्यार्थ्यांला प्रोसेस करावी लागेल.
जेईई (मेन) 2024 ही परीक्षा तब्बल 13 भाषांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.