धुळे: आज अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. यावेळी रामाप्रती असलेली भक्ती विविध माध्यमातून साकार करण्यात आली. धुळ्यातील संतोष ताडे यांनी इडलीवर राम नाम उमटवण्याचा अनोखा उपक्रम आजच्या दिवशी राबवला आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून विविध माध्यमातून रामाप्रती असलेली भक्ती साकारण्यात आली. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी रांगोळ्या असतील किंवा मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे अशा विविध माध्यमातून उद्घाटनाचा सोहळा साजरा करण्यात आला.

धुळ्यातील संतोष ताडे हे इडली सांबर विक्रीचा व्यवसाय करतात आजच्या राम मंदिर उद्घाटनाच्या आणि प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने त्यांनी इडलीवर रामनाम उमटविण्याचा उपक्रम राबविला संतोष ताडे यांनी इडलीवर शुद्ध केशराने रामनाम लिहून ही इडली विक्रीसाठी ठेवली होती. यावेळी नागरिकांकडून देखील या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.