प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना मोमीनपुरात अचानक तणाव, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे घटना टळली, नेमका प्रकार काय?

नागपूर : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतानाच सोमवारी दुपारी मध्य नागपुरातील मोमीनपुरा परिसरात अचानक तणाव निर्माण झाला. वेळीच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह प्रचंड पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. वृत्त लिहिपर्यंत या परिसरात तणावसदृश्यस्थिती होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोमीनपुरा परिसरात शीघ्र कृती पथक, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांसह सशस्त्र पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बजेरियातील आठ मुले झेंडे लावलेल्या तीन मोटारसायकलींनी छोटी खदानमधील हनुमान मंदिरात दर्शनाला गेले. दर्शन घेऊन ते भगवाघर चौकाकडे जायला निघाले. मोमीनपुऱ्यातील एका धार्मिकस्थळावर या मुलांनी जय श्रीरामच्या घोषणा दिली. यादरम्यान कोणीतरी मुलांन चप्पल फेकून मारली. मुले तेथेच थांबवले. त्यांनी परिसरात उभ्या नागरिकांना जाब विचारायला सुरुवात केली. याचदरम्यान ३० पेक्षा अधिक नागरिक तेथे जमले. त्यांनी १४ वर्षीय मुलाला जबर मारहाण केली.यात मुलगा जखमी झाला. काही मुले वाहन घेऊन भगवाघर चौकात गेले. घटनेची माहिती दिली.

त्यानंतर शेकडो नागरिक भगवाघर चौकात जमा झाले. ते मोमीनपुराकडे जायला निघाले. मध्य नागपुरात प्रचंड तणाव निर्माण झाला. याबाबत कळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलिस आयुक्तद्वय प्रमोद शेवाळे, संजय पाटील यांच्यासह सर्वच पोलिस उपायुक्तांसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलीस आयुक्तांनी शांततेचे आवाहन करीत घटनेची माहिती घेतले. सीसीटीव्हीची पाहणी करून तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश तहसील पोलिसांना दिले.

वातावरण बिघडू देऊ नका…

या घटनेबाबत कळताच आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवार आदीही तेथे पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ध्वनीक्षेपकाद्वारे दटके यांनी शांतता राखण्याचे आव्हान दोन्ही समुदायाला केले. राष्ट्रीय उत्साव साजरा होत असताना शहरातील वातावरण बिघडवू नका. पोलिस दोषींवर कारवाई करणार आहेत, असे सांगत त्यांनी जय श्रीरामची घोषणा दिली. त्यानंतर तणाव निवळला.

खास पोषाख, पुजेचं साहित्य हातात, राम मंदिर सोहळ्यासाठी मोदी पोहोचले

दोन्ही समुदायांच्या धर्मगुरुंकडून शांततेचे आवाहन

नागपूर शांतताप्रिय शहर आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य बाहे. नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन दोन्ही समुदायातील धर्मगुरू लोप्रतिनीधींनी केले. सुमारे दोन तास या परिसरात तणावाचे वातावरण होते.

Source link

mominpura nagpur newsNagpur newsNagpur news updateअयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानागपूर मोमीनपुरा
Comments (0)
Add Comment