म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यात शहर पोलिसांना अद्यापही यश येत नाही. मोहोळचा खून झाला त्याच दिवशी मारणेचे नाव ‘रेकॉर्ड’वर आले होते. मात्र, पंधरा दिवसांनंतरही मारणेचा शोध सुरूच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मोहोळ खून प्रकरणात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी मुन्ना पोळेकर आणि अन्य दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्यानंतर ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत’ असे म्हणल्याचे या प्रकरणातील तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी गणेश मारणेचे नाव मोहोळ खून प्रकरणाशी जोडले गेले होते. गुंड विठ्ठल शेलार याला मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याचप्रमाणे गणेश मारणेचीदेखील चौकशी करण्यात येणार होती. मात्र, मारणे तेव्हाच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यानंतर कोथरूड पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरीदेखील चौकशी केली. मात्र, तो सापडला नाही. त्याचा फोनही बंद होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची सुत्रे हातात घेतल्यानंतर मोहोळ खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हेच असल्याचे समोर आले. मोहोळच्या खुनाच्या आधी एक महिना मुळशी येथे आरोपींची बैठक झाली होती. त्यात मोहोळच्या खुनाचा कट रचण्यात आला होता. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी शेलार आणि त्याचा साथीदार रामदास उर्फ वाघ्या मारणे याला अटक केली. त्यानंतरही गणेश मारणेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक केली आहे. विठ्ठल शेलार आणि वाघ्या मारणे वगळता उर्वरित आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
कोण आहे गणेश मारणे?

पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गजानन मारणे आणि गणेश मारणे यांची नावे आघाडीवर होती. मारणे मूळचा मुळशीतील; तो पुण्यात एरंडवणे भागातील खिलारेवाडी येथे राहत होता. दोन्ही मारणेंच्या मागून येऊन बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीप मोहोळने गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी गणेश मारणे टोळीने कट रचून ऑक्टोबर २००६मध्ये पौड फाटा येथे संदीप मोहोळवर गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणात गणेश मारणेची निर्दोष सुटका झाली, तर त्याच्या तिघा साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News