अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

म. टा. प्रतिनिधी, जळगावः जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील २० ते २५ गावांना मागील दोन दिवसात चक्रीवादळासह झालेल्या अतिवृष्टीने तडाखा दिला. यात तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. २५० घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील पशुधनाचेही नुकसान झाले आहे. कापणीवर आलेल्या केळीच्या बागा आणि पूर्वहंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आज बुधवारी सकाळपासून भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली

सोमवारी तसेच काल मंगळवारी दिवसभर अजिंठा पर्वतरांगामध्ये तसेच जामनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण?; राष्ट्रवादीकडे मदत मागत केला गंभीर आरोप

जामनेर तालुक्यातील २० ते २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये समोर आले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव आणि पहूर, टाकळी बुद्रुक, मेणगाव, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी, तिघ्रे वडगाव, भागदरा, तोंडापूर, शेळगाव, कासली व सावरला या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच ठिकाणी शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस; चाळीसगावात पुन्हा पूरस्थिती

व्यथा मांडतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तहसीलदार अरुण शेवाळे आदी उपस्थित होते. आपल्या झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडताना अनेक शेतकऱ्यांना रडू कोसळले होते.

‘मराठी माणसाने तुमच्या १५ कोटींच्या ‘पेंग्विन विकासाचे मॉडल’ नाकारले’

राज्य सरकारने नुकसाग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसू नयेतः गिरीश महाजन

पाहणी केल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, कापूस, मका यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात यापूर्वीही यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळीही पंचनामे झाले. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक दमडीही मदत मिळालेली नाही. मागच्याच आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणी मदतीची घोषणा झाली. पण नुकसानग्रस्तांना काहीही मिळालेले नाही. राज्य सरकारने किमान आता तरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

नांदेडमध्ये पावसाचं रौद्ररुप, वाहून गेलेल्या पिता-पुत्राचे मृतदेह अखेर सापडले

Source link

heavy rain jalgaonjalgaon rainmaharashtra rain updaterain affects croprain in jalgaon newsrain in jalgaon today
Comments (0)
Add Comment