रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष व्यवस्था केली. दुपारी मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच रामनामाचा गजर झाला. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत व्यापले आणि संपूर्ण विदर्भ रामनामी रंगला.

भंडाऱ्याचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच अखंड रामनामाचा जप करण्यात आला. मंदिर परिसरात ५१ फूट उंच ध्वज लावण्यात आले. सायंकाळी भजनसंध्या झाली. लाखनी तालुक्यातील पालांदूरला अयोध्येसारखे सजविण्यात आले होते. तुमसर, पवनी, पालांदूर, कवलेवाडा व मेंगापूर येथील मंदिरात रामनामाचा गजर झाला. गोंदियात महाआरती केल्यानंतर मिरवणुका निघाल्या. अयोध्येतील सोहळ्याने चंद्रपुरातील तीन दिवसीय उत्सवाची सोमवारी सांगता झाली. तत्पूर्वी रामायणातील प्रसंगांवर आधारित नाटक सादर झाले. यात ५०हून अधिक कलाकारांनी भूमिका साकारल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात २०० कलाकारांचा सहभाग होता. यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रांगणावर भजनसम्राट दिनेश शर्मा यांच्यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध ११ प्रकारच्या तांदळापासून तयार पदार्थांचे महाप्रसाद वितरीत करण्यात आले. वाशीमसह मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा, कोलार येथील राममंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. मालेगावात भाजयुमोने ५००१ दिव्यांचे तर संतोष शिंदे यांनी ७१ हजार लाडूंचे वाटप केले.

नाशिकच्या महाशिबिरानंतर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सत्तेत आणलेलंं, उद्धव ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती घडवणार?

दिव्यांनी उजळले ‘श्रीं’चे मंदिर

बुलढाणा जिल्ह्यातील संतश्रेष्ठ गजानन महाराज संस्थान शेगाव, श्री प्रल्हाद महाराज मंदिर साखरखेर्डा आणि श्री क्षेत्र माकोडी येथे अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव झाला. श्रींच्या मंदिर परिसरात तोरण, केळीचे खांब, रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. शंख, नगारा वादन, पुष्पवृष्टी आणि महाआरती झाली. सायंकाळी दीपोत्सवाने मंदिर उजळले होते. बुलढाणा अर्बनच्यावतीने रामभक्तांना लाडूची वीस हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. संस्थेच्या मुख्य शाखेच्यावतीने गोवर्धन इमारतीसमोर संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ. सुकेश झंवर व संस्थेचे सरव्यवस्थापक कैलाश कासट यांच्याहस्ते हे लाडूवाटप झाले. रूद्र ढोल-ताशा पथकाने तब्बल ५०१ दिव्यांनी ‘जय श्रीराम’ साकारले. खामगावात भाजपने ४० हजार श्रीराम रक्षा स्रोताचे वाटप करण्यात आले. तर लोणारमध्ये मोटारसायकल रॅली लक्षवेधी ठरली.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

गडचिरोली : अयोध्या येथे श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह गडचिरोली जिल्ह्यात दिसला. अनेक ठिकाणी कलशयात्रा व मिरवणुका निघाल्या. आरमोरी येथे राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, नितीन जोध, प्रदीप सेलोकर, अंकुश खरवडे, सुनील खोब्रागडे, बाळू हेमके यांनी स्वखर्चातून हे हेलिकॉप्टर मागविले होते. या हेलिकॉप्टरने मंदिराला फेरी घालून पुष्पवृष्टी केली. यासोबतच सिरोंचा, एटापल्ली, भामरागडपासून ते कोरचीपर्यंत सर्वत्र कार्यक्रम झाले.

कारसेवकांच्या संघर्षामुळे स्वप्नपूर्ती : फडणवीस

कॅप : अमरावतीच्या हनुमान गढी परिसरात आयोजित कारसेवकांच्या सत्कार सोहळ्यात विचार व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे व मान्यवर.

अमरावती : राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी होतो. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. कारागृहातही गेलो. हजारो कारसेवकांच्या संघर्षामुळेच आज राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, असे भावपूर्ण उद्‌गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून हनुमान गढी परिसरात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा स्वाभिमानी पक्षातर्फे ११ लाख बुंदीच्या लाडूंचेही वाटप करण्यात आले. बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर भाजप नेते तुषार भारतीय यांच्या मित्र परिवारातर्फे गंगा आरती करण्यात आली.अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजा अर्चना करण्यात आली. श्री अंबादेवी मंदिर, भक्तिधाम, सतीधाम, राम मंदिर रोशणाईने उजळले होते. श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात ११ दिव्यांचा उत्सव साजरा झाला.

जालन्यात वकिलाने लाखो खर्चून उभारलं राम मंदिर; अयोध्येप्रमाणे आजच केली श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा

Source link

Amravati newsayodhya ram templeNagpur newsram temple consecrationअमरावती न्यूजनागपूर न्यूजराम मंदिर प्राणप्रतिष्ठाराम मंदिर सोहळा
Comments (0)
Add Comment