क्वॉलकॉमचा दमदार प्रोसेसर मिळणार बजेटमध्ये; Vivo च्या नव्या 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक

विवोनं गेल्यावर्षी २०२३ मध्ये वाय१०० स्मार्टफोन लाँच केला होता जो उन्हात रंग बदलणाऱ्या Color Changing टेक्नॉलॉजीसह आला होता. आता बातमी आली आहे की कंपनी या फोनच्या नवीन मॉडेलवर काम करत आहे जो Vivo Y100 5G नावानं लाँच केला जाईल. या नवीन व्हर्जनचे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत. चला जाणून घेऊया फोनची संपूर्ण माहिती.

Vivo Y100 5G लीक स्पेसिफिकेशन्स

विवो वाय१०० ५जी फोन ६.६७ इंचाच्या मोठ्या मोठी स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार पंच-होल स्टाइल असलेला हा डिस्प्ले अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल जो ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. यात १२००निट्स ब्राइटनेस देखील मिळू शकते. तसेच या विवो स्मार्टफोनची थिकनेस ७.७९मिमी असू शकते.

Vivo Y100 5G फोनच्या हा मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेटसह लाँच केला जाईल, अशी माहिती लीकमध्ये समोर आली आहे. हा क्वॉलकॉमचा बजेट फ्रेंडली ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो २.२गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. जोडीला ८जीबी रॅम मिळण्याची शक्यता आहे. तसेच १२८जीबी तसेच २५६जीबी स्टोरेजचे दोन ऑप्शन्स मिळू शकतात. या फोनमध्ये ८जीबी वचुअर्ल रॅम देखील मिळेल ज्यामुळे फोनला १६जीबी रॅमची ताकद मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, हा विवो फोन ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरला सपोर्ट करेल. तसेच फ्रंट पॅनलवर ८ मेगापिक्सल सेल्फी सेन्सर मिळू शकतो.

फोनमध्ये सिक्योरिटीसाठी अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. फोन लेदर फिनिश आणि अँटी-स्टेन कोटिंगसह बाजारात येऊ शकतो. हा मोबाइल बाजारात आयपी५४ रेटिंगसह येऊ शकतो. Vivo Y100 5G फोनचा हा नवीन मॉडेल ५,०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. लीकनुसार, ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये ८०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

Source link

vivovivo 5g phonevivo y100 5gविवोविवो मोबाइलविवो वाय१०० ५जी
Comments (0)
Add Comment