आजूबाजूचा गोंधळ होईल छूमंतर! जबरदस्त नॉइज कॅन्सलेशन येत आहेत OnePlus Buds 3; किंमत झाली लीक

OnePlus भारतासह जागतिक बाजारात OnePlus 12 सीरीज स्मार्टफोन २३ जानेवारी म्हणजे आज लाँच करणार आहे. यातील OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोनची किंमत देखील लाँच पूर्वीचा ऑनलाइन लीक झाली आहे. परंतु या इव्हेंट मधून फक्त स्मार्टफोन नव्हे तर कंपनी आपले नवीन इअरबड्स देखील बाजारात लाँच करणार आहे. त्याच OnePlus Buds 3 ची किंमत टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केली आहे. चाल जाणून घेऊया तुमच्या बजेटमध्ये बसत आहेत का कंपनीचे आगामी इअरबड्स.

OnePlus Buds 3 ची लीक किंमत

ऑनलाइन लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Buds 3 ची भारतात एमआरपी १२,९९९ रुपये असेल. परंतु पहिल्या सेल दरम्यान इअरबड लाँच ऑफर अंतर्गत १०,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ऑफिशियल लाँच पूर्वीच OnePlus नं OnePlus Buds 3 मधील फीचर्सची माहिती दिली आहे, ज्यात टच वॉल्यूम कंट्रोल, ४४ तासांची बॅटरी लाइफ आणि अडॅप्टिव नॉयज कॅन्सलेशनचा समावेश आहे. हे इअरबड चीनमध्ये आधीच उपलब्ध झाले आहेत त्यामुळे इतर स्पेसिफिकेशन्स देखील सहज उपलब्ध झाले आहेत.

OnePlus Buds 3 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Buds 3 मध्ये १०.४मिमी कंपोसाइट डायाफ्राम बेस यूनिट देण्यात आला आहे, जो क्लियर साउंड आणि डीप बेस देतो. यात थ्री-मायक्रोफोन एआय सिस्टम ४९डेसिबल अ‍ॅक्टिव्ह नॉयज कॅन्सलेशन मिळते, त्यामुळे बॅकग्राउंड नॉयज खूप कमी होते. एलएचडीसी ५.० हाय-रेज सपोर्टसह हे बड्स ९६किलोहर्ट्झ सॅम्पलिंग रेट आणि १एमबीपीएस वायरलेस स्पीडवर हाय क्वॉलिटी ऑडियो ट्रांसमिशन मिळते.

हे खासकरून गेमिंगसाठी डिजाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे कस्टम गेम साउंड इफेक्ट, नवीन साउंड फील्ड एक्सपांशन, ३डी स्पॅशियल साउंड इफेक्ट आणि इमर्सिव इन-गेम साउंडसाठी ९४मिलिसेकंद लो लेटेंसी मिळते. OnePlus Buds 3 नॉयज कॅन्सलेशनविना ४४ तासांपर्यंत वापरता येतात. तसेच हे १० मिनिटांच्या क्विक चार्जिंगसह ७ तासांपर्यंत वापरता येतात. इअरबड्स धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहावेत म्हणून कंपनीनं आयपी ५५ रेटिंग दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.३ चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

OnePlusoneplus buds 3oneplus buds 3 price in indiaवनप्लसवनप्लस बड्स ३
Comments (0)
Add Comment