शिंदेंच्या बंडानं फरक पडत नाही, आम्ही लढू अन् जिंकू, संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महाशिबिर म्हणजेच अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाशिबिराला संबोधित केलं. यावेळी प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं आहे. शिवसेनेचं रामाशी जिव्हाळ्याचं आणि अत्यंत भावनिक नातं आहे, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई यांनी लावलं आहे ते पाहायला हवं. शिवसेनेचे वाघ अयोध्येत पोहोचले. शिवसेनेच्या वाघांनी धैर्य, शौर्य दाखवलं म्हणून पंतप्रधानांना अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली, असं संजय राऊत म्हणाले.

आपण या धर्मक्षेत्रातून आणि कुरुक्षेत्रातून लढाईला सुरुवात करत आहोत. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वाधिक संघर्ष पंचवटीत झालेला आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी या भूमीची अधिवेशनासाठी निवड केली त्याला फार महत्त्व आहे. श्रीराम आणि शिवसेनेचे नातं असं आहे, रामाचं धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य, रामाचं शौर्य आहे ते शिवसेनेचे शौर्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संयमी योद्धा ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. आता ती उद्धव ठाकरेंना शोभून दिसते. रामानं जे अतुलनीय धैर्य दाखवलं ते पंचवटीत दाखवलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.रामाच्या हातात आता धनुष्यबाण आहे मला असं वाटतंय रामाच्या हातात मशाल येईल, असं संजय राऊत म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, धुळ्यात पारा ६.३ अंशावर, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान
रामाचं धैर्य हे असत्याविरोधात आहे. रामाचं धैर्य हुकूमशाही दूर व्हावी, शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा यासाठी आहे. प्रभू श्रीरामावर अन्याय झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या असतील पण राम शांत राहिला होता. त्याप्रमाणं उद्धव ठाकरे देखील शांत आहेत अन् योग्यवेळेची वाट पाहत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भक्तांचा महासागर, अयोध्या मंदिरात दुसऱ्याच दिवशी प्रचंड गर्दी
दशरथपुत्र राम अयोध्येत राहिले तोपर्यंत युवराज होते. जंगलातून संघर्ष करुन बाहेर आले तेव्हा भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम बनले, असं संजय राऊत म्हणाले. रामाचा अपमान झाला तेव्हा त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली. उद्धवसाहेब वेट अँड वॉच आपली पण वेळ येईल, असं राऊत यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानं फरक पडत नाही, आपण जिंकू असं राऊत यांनी सांगितलं.
चौकशीला गेल्यावर माझ्यावर ‘ईडी’कडून काही चुकीचं झालं तर… रोहित पवारांची भावनिक पोस्टRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Sanjay Rautshivsena ubtUddhav Thackerayउद्धव ठाकरेशिवसेना ठाकरे गटशिवसेना ठाकरे गट अधिवेशनसंजय राऊतसंजय राऊतांचा हल्लाबोल
Comments (0)
Add Comment