हायलाइट्स:
- मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह इथे दुपारी एका धावत्या प्रवासी कारने घेतला पेट.
- काही क्षणात कारमधील सीएनजी किटचा झाला स्फोट
- चालकाने प्रसंगावधान राखून कारमधील प्रवाशांना वेळीच उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
मुंबई: मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह इथे दुपारी एका धावत्या कारने पेट घेतला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून कारमधील प्रवाशांना वेळीच उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. ही कार प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन जात होती. या घटनेमुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. मरीन ड्राइव्हजवळ वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. (A passenger car caught fire near Marine Drive and a CNG kit exploded)
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाकडे दोन प्रवाशांना घेऊन निघालेली ही कार मरीन ड्राइव्ह इथे आल्यानंतर कारमधून धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आली. चालकाने जराही विलंब न लावता वेळीच कार रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि कारमधील दोन प्रवाशांनाही तत्काल उतरवले. बघता बघता धूर वाढत गेला आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला. त्यानंतर कारमधील सीएनजी किटचा स्फोट झाला.
क्लिक करा आणि वाचा- महिला अत्याचाराचे निवडक गुन्हे ‘वूमन अॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत; चित्रा वाघ यांची मागणी
पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी
मरीन ड्राइव्ह येथे असलेल्या मफतलाल चौकाजवळ चालत्या गाडीला आग लागली. गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीमधील असलेल्या सीएनजी किटचा स्फोटझाला. या स्फोटात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘भाजपने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे’
car catches fire in Mumbai : मुंबईत मरीन ड्राइव्हवर धावत्या कारनं घेतला पेट; दैव बलवत्तर म्हणून…
क्लिक करा आणि वाचा- ‘बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव’
या घटनेबाबत कारच्या चालकाने माहिती देताना सांगितले की, मी विमानतळाकडे जात होतो. जात असताना कारमधून हळूहळू धूर येताना मला दिसला. मी कार थांबवली आणि गाडीच्या बाहेर आलो. गाडीतील प्रवाशांना देखील मी उतरण्यास सांगितले. आणि पाणी मारू लागलो. मात्र, फक्त पाच मिनिटात आग भडकली. त्यानंतर गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही.