प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा

रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा,शोभायात्रा विविध कार्यक्रम सुरू आहेत,दापोली येथे हत्तीवरून साखर वाटत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दापोली शहरा जवळ असलेल्या जालगावचे सरपंच भाजपाचे प्रदेश युवा नेते उद्योगपती अक्षय फाटक व सहकारी ग्रामस्थांनी यांनी या सगळ्या कार्यक्रमाचे नेतृत्व केलं.

कोल्हापूर येथील हलगी, ढोल ताशा पथक ,बैलगाडी, लेझीम पथक, महिलांचे लेझीम पथक, भजन, सनई चौघडा असा या सगळ्या शोभा यात्रेचा हा थाट होता. जवळपास तीन ते चार किलोमीटर लांब इतकी भव्य ही शोभायात्रा होती. आपले वडील कै. श्रीधर फाटक हे विश्व हिंदू परिषदेचे दापोलीचे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी आयोध्या येथे ज्या वेळेला प्रभू श्रीराम असं मंदिर उभे राहील त्यावेळेला आपण दापोलीत हत्तीवरून साखर आटू असा शब्द दिला होता ही आपल्या वडिलांची इच्छा भाजपाचे प्रदेश युवा नेते उद्योगपती अक्षय फाटक यांनी आज हे स्वप्न पूर्ण केले आहे. वडिलांची ही इच्छा मुलाने पूर्ण केली आहे. साखर वाटण्यासाठी खास हत्ती हा कर्नाटक येथून मागवण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापि होणे नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

22 जानेवारी रोजी सकाळी या हत्तीचा आगमन दापोली येथे अक्षय फाटक यांच्या निवासस्थान परिसरात झाले. एका ट्रक मधून हत्ती खास दापोली येथे आणण्यात आला. हत्तीवरून साखर वाटण्याचा बहुमान कारसेवकांना देण्यात आला आहे. दापोली शहराजवळ जालगाव येथील ग्रामदैवत श्री भैरी मंदिर येथे पूजा, मंत्रघोष व आरती केल्यानंतर या भव्य शोभायात्रेला शुभारंभ करण्यात आला. या भव्य शोभा यात्रेला दुपारी चार वाजता सुरुवात झाली. जालगाव, दापोली शहर बाजारपेठ, फॅमिली माळ, या सगळ्या परिसरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अवघ्या कोकणात या मिरवणुकीची उत्सुकता लागून राहिली होती ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते दापोली येथे दाखल झाले होते. या हत्तीवरून साखर वाटण्यासाठी कार सेवकांना बहुमान देण्यात आला होता. कारसेवक हत्तीच्या अंबारी वर बसून ही साखर पुड्यांमधून वाटत होते. तसेच या शोभा यात्रेदरम्यान दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आयोध्या येथे सहभागी झालेल्या कारसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला. हत्तीवरून साखर वाटत निघणारी ही शोभायात्रा पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून आलेल्या लोकांची मोठी गर्दी होती. या शोभायात्रेत दापोली मंडंगगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनीही काहीवेळ सहभाग घेतला होता.

हा दुग्धशर्करा व दुर्मिळ योग कोकणात दापोली येथे जुळून आला आहे. ज्यांनी हा हत्ती आणला ते अक्षय फाटक यांनी सांगितले की, हा सगळा योग प्रभू श्री रामचंद्र यांच्या आशीर्वादाने रामभक्तांमुळेच हा सगळा योग जुळून आल्याची भावना व्यक्त केली आहे. अयोध्या येथे आज प्रभू श्रीराम मंदिर उभं करण्याचे स्वप्न पूर्ण झाल आहे आणि आज ही निघालेली भव्य शोभायात्रा आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी आहे अशी प्रतिक्रिया अक्षय फाटक व सौ स्नेहा फाटक यांनी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ जवळ बोलताना दिली आहे. या शोभायात्रेत लहानांपासून थोरांपर्यंत सगळे मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदींचा सगळ्यांना रामराम, आधी श्रीरामाची क्षमा मागितली नंतर न्यायव्यवस्थेचे आभारही मानले

Source link

Dapoli newsKonkan Newsram mandir pranpratishtaram templeram temple inaugrationRatnagiri newsरत्नागिरी न्यूजराम मंदिर न्यूज
Comments (0)
Add Comment