पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली.

नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि. परभणी) यांनी शनिवारी (२० जानेवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण निर्वळ ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते ॲनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीने नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला असता भांडण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकाराला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारीला राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शनिवारी (२० जानेवारी) शवविच्छेदन झाले.

भावाला दिली होती कल्पना

नारायण निर्वळ यांनी मानसिक, शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालायने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक सोहन धोत्रे तपास करीत आहेत.

कंपनी सुरू करण्याचे स्वप्न विरले

नारायण निर्वळ यांचा ॲनिमेशन क्षेत्रात हातखंडा होता. काही जणांसोबत ते भागीदारीमध्ये काम करीत होते. त्यासाठी एक छोटे कार्यालय थाटले होते. या कामाला मोठे स्वरूप देऊन स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न अर्धवटच राहिले.

Source link

husband commit suicidehusband ends lifehusband wife fightpimpriPimpri Chinchwadpune live newsPune newswife and sister in law torture man
Comments (0)
Add Comment