‘या’ जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय; कलम ३६ लागू

हायलाइट्स:

  • चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • जिल्ह्यात कलम ३६ लागू
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

चंद्रपूर : राज्यभरात १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून २१ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आलं आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसंच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजवण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असं जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितलं आहे.

raju shetti criticizes govt: राजू शेट्टी यांचा आघाडी सरकारसह केंद्र सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

नव्या आदेशानंतर पोलिसांना असणार ‘हे’ अधिकार

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसंच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश, धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजवणे इत्यादीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजवण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसंच कलम ३३, ३५ ते ४० व ४५ मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

दरम्यान, सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजवणे, मिरवणुकीत घोषणा देणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Source link

chandrapurganesh festivalगणेशोत्स २०२१गणेशोत्सवचंद्रपूरचंद्रपूर न्यूज
Comments (0)
Add Comment