आधी ब्लँकेटची किनार उसवली; लोखंडी सळाखीला बांधली अन्…, तुरुंगातच आरोपीचं धक्कादायक कृत्य

नागपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात अटकेतील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
रिसॉर्टमध्ये परदेशी तरुणीसोबत तरुणाचा मुक्काम; दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह सापडले
मिळालेल्या माहितीनुसार, शेख तौसिफ शेख फैजान ताज (२३), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात तौसिफला अटक करण्यात आली आहे. सोमवारी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर तायडे (५०) हे लॉकअप ड्युटीवर (गार्ड ड्युटी) होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तपास अधिकारी आठवले यांनी तौसिफला तपासासाठी कोठडीतून बाहेर काढले. सायंकाळी ७.३५ वाजता त्याला परत लॉकमध्ये टाकले. १०.३० वाजताच्या सुमारास तायडे यांना लघुशंका आली.

गोविंददेव गिरींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना, संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

सहकाऱ्यांना तौसिफकडे लक्ष देण्यास सांगून तो लघुशंकेला गेले. याच दरम्यान तौसिफने ब्लॅकेंटची कापडी किनार उसवली. ती लोखंडी सळाखीला बांधून गळफास घेतला. सहकाऱ्यांना तो दिसला. त्यांनी आरडाओरड केली. आवाजाने उपनिरीक्षक माधव गुंडेकर, अंकुश वाळके, नरेश डवरे तसेच तायडे हे कोठडीकडे धावले. तायडे यांनी चावीने कोठडीचे कुलूप उघडले. फास काढून तौसिफला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी तौसिफविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Source link

accused attempted suicideaccused attempted suicide in jailhudkeshwar police station newsNagpur newsआरोपीचा आत्महत्येचा प्रयत्नआरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्ननागपूर बातमीहुडकेश्वर पोलीस ठाणे बातमी
Comments (0)
Add Comment