मराठा व खुल्या प्रवर्गांच्या सर्वेक्षणासाठी अशिक्षित तमिळ सफाई कामगार, BMC च्या नेमणुकीवर प्रश्न

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत मंगळवारपासून मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू झाले. या सर्वेक्षणात अशिक्षित तमिळ सफाई कामगारांनाही जुंपण्यात आले आहे. मराठी लिहिता, बोलता येत नसल्याने सर्वेक्षण कोणत्या आधारे करणार, असा सवाल या कामगारांनी केला आहे.

मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात आधी मुंबईचे पालिकेचे अभियंता, त्यानंतर आरोग्य सेविकांना जुंपण्यात आले. आता सफाई कामगारांवरही सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणातील परिपत्रकात १२३ प्रश्न नमूद केले आहेत. यात निवासी पत्ता, नोकरी कुठे करता, घरी कोण असते, मुलींनी अर्धवट शिक्षण का सोडले, शिक्षण कुठे घेतले, घरातील सदस्य विवाहित, अविवाहित, घरात महिला, पुरुष व तृतीयपंथ किती, कुटुंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडले असल्यास आरोग्य सेवा मिळते का, असे विविध प्रश्न सर्वेक्षणात विचारण्याबाबत परिपत्रकात नमूद केले आहे.

नगरमध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

‘सर्वेक्षणात पालिका कर्मचाऱ्यांना समावून घेणे समजण्यासारखे आहे. मात्र ज्या सफाई कामगारांना लिहिता, वाचता येत नाही, ते सर्वेक्षण कसे करणार’, असा सवाल महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी उपस्थित केला आहे. ‘राज्य सरकारने सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी पालिका वाटेल त्या मार्गाने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत आहे. मात्र ते करताना कोणताही सारासार विचार करण्यात आलेला नाही’, असे रानडे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करणारं अॅप पहिल्याच दिवशी बंद पडलं

Source link

BMCmaratha quota surveyMumbai Municipal Corporationmumbai newsमराठा आरक्षणमराठा सर्वेक्षणमुंबई न्यूजमुंबई महापालिका
Comments (0)
Add Comment