रुद्राक्ष आणि भगवे कपडे घालून बाळासाहेब होता येत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सातारा : बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही. त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाचा यात्रेसाठी आलेले आहेत. आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम देखील केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लांडग्यांनी वाघाचं कातडं पांघरल म्हणजे लांडगा वाघ होत नाही. त्याला वाघाचं काळीज लागत. वाघ एकच बाळासाहेब ठाकरे! बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ते घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. माझी शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी माझ दुकान बंद करेन म्हणणारे बाळासाहेबांचे विचार मग मिंधेपणा कोणी केला याचा विचार जनतेनी केला आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागले आणि स्वार्थासाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले. बाळासाहेबांसारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही. त्यासाठी बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी सोडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मोदींना साष्टांग दंडवत लोटांगण घालायला पाहिजे होते, पण ते काँग्रेसला घालायला लागलेत. त्यामुळे मी काल पण हेच बोललो आहे. पब्लिक सब जानती है! काल त्यांनी माझ्यावर टीका केली, तरी त्यांनी मोदींवर टीका केली. काय अधिकार आहे, ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचे स्वप्न काश्मीरमध्ये ३७० कलम हटवून साकार केले, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

सदावर्ते म्हणाले, मुंबई विस्कळीत होईल-जरांगेंना अडवा, हायकोर्टाचा मोठा निर्णय, आंदोलनाला आडकाठी नाही

यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारले असता उत्तर देताना एकनाथ शिंदे बोलत होते. राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘खिचडी चोर’ आणि ‘कफन चोर’ लोकांना कसे काय निवडून देणार लोक! मोदी साहेब महाराष्ट्रात आले की उध्दव ठाकरे यांच्या पोटात दुःखते. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित येऊन बुलेट ट्रेनच काम करतंय, असं म्हणत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. जनता कामाला महत्व देते, शिवडी न्हावा शेवा गेमचेंजर प्रकल्प, समृध्दी महामार्ग असे अनेक प्रकल्प आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, आंदोलनकर्त्यांनी विचार करायला हवा | एकनाथ शिंदे

Source link

balasaheb thackerayCM Eknath Shindesatara newsShivsenaUddhav Thacekrayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेसातारा मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment