लग्नसमारंभाहून परतताना अनर्थ, कारला समोरुन जोरदार धडक; भीषण अपघातात वन विभागाच्या ऑफिसरह दोन जण ठार

नागपूर : रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर – तुमसर बायपास परिसरात भरधाव मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने वन विभागाच्या राउंड ऑफिसरह दोन जण ठार तर वनरक्षकासह दोन जण जखमी झाले आहेत. राउंड ऑफिसर स्वप्निल जाधव व अस्थायी कर्मचारी मनोज इनवाते, अशी मृतकांची नावे आहेत. वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि नितेश कुंभलकर,अशी जखमींची नावे आहेत.

चौघेही एका लग्नसमारंभाला गोंदियाला गोरेगाव येथे गेले होते. समारंभ आटोपून आज बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास चौघेही एमएच ३३ ए ४१३२ या क्रमांकाच्या कारने परत येत होते. रामटेकमधील बायपास परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २८ ए ४७७१ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने कारला समोरुन धडक दिली. यात कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात चौघेही जखमी झाले.

मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा उद्या नवी मुंबईत मुक्काम, २ दिवस APMC बंद ठेवून आंदोलकांना राहण्यासाठी जागा देणार
अपघातानंतर मालवाहू वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. माहिती मिळताच रामटेक पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.पोलिसांनी चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टश्रांनी तपासून जाधव यांना मृत घोषित केले. अन्य तीन जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मनोज इवनाते यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांचा उपचार सुरू आहे. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या मित्राकडूनच प्रणितींना चॅलेंज, खरटमल लोकसभा लढविणार? राष्ट्रवादी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत

Source link

forest department officer accidentmaharashtra accident newsNagpur Forest Department Officer Accidentnagpur ramtech accidentनागपूर रामटेक अपघातनागपूर वन विभाग ऑफिसर अपघातमहाराष्ट्र अपघात बातम्यावन विभाग ऑफिसर अपघात
Comments (0)
Add Comment