मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवण्याची धडपड, आई मिरची तोडायला गेली अन अनर्थ घडला

चंद्रपूर: वैनगंगा नदीत मंगळवारी बोट उलटून सहा महिलांचा मृत्यू झाला होता. शोधकार्यादरम्यान यापैकी एकाच महिलेचा मृतदेह हाती लागला होता. तर बुधवारी पहाटे आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेचे नाव रेवंता झाडे असे आहे. या महिलेच्या मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते. मात्र, त्यापूर्वीच दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.ज्या घरात लग्नसोहळ्याचं आनंदी वातावरण असायला हवं होतं, त्या घरावर दुःखाचे गडद सावट पसरलं. दोन महिन्यानंतर मुलीचं लग्न ठरलेलं. त्यासाठी कुटुंब पै-पै जोडत होते. अशात मिरची तोडायला गेलेल्या महिलेवर काळाने घाला घातला. आज त्या महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह बघताच मुलीनं एकच टाहो फोडला. केवळ कुटुंबावरच नाही तर संपूर्ण गाव दुःखात बुडाले. चंद्रपूर-गडचिरोली सीमेवर नाव दुर्घटना घडली. यात सहा महिलांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही जिल्हावर शोककळा पसरली आहे. आज रेवंता हरीचंद्र झाडे यांच्या मृतदेह सापडला. रेवंता झाडे यांची मुलगी काजल हिचा एप्रिल महिन्यात विवाह ठरला आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हात शेतमजुरांचा हाताला काम नाही. त्यामुळं या दोन्ही जिल्हातील नागरिक थेट राज्याची सीमा ओलांडून रोजगाराला जातात. सध्या मिरची तोडण्याचा हंगाम सुरु आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हातील हजारो शेतमजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडायला गेले आहेत. काही मजूर इत्तर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत.अशात गडचिरोली जिल्हातील गणपूर येथील शेतमजूर पोटाची खडगी भरण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून नावेने चंद्रपूर जिल्हातील गंगापूर टोक शेतशिवारात मिरची तोडायला निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. नदी पात्राचा मध्यभागी नाव येताच नाव बुडाली. या दुर्घनेत सहा महिलांचा दुदैवी मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते. तर बुधवारी पहाटेला रेवंता झाडे या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप, मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले

एप्रिल महिन्यात मुलीचं लग्न

रेवंता झाडे यांची मुलगी काजल हिचं लग्न ठरलं आहे. २८ एप्रिल लग्नाची तारीख ठरवली गेली आहे. मुलीचं लग्न ठरल्याने घरात आनंदी वातावरण होते. लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू होती. इतरांच्या शेतात कुटुंब मजुरीसाठी जात होते. मंगळवार ला रेवंता झाडे या मिरची तोडण्यासाठी नावेने निघाल्यात. मात्र नाव बुडाली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

मुलीचा टाहो

नाव दुर्घटनेची माहिती मिळताच झाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगी काजल हिने टाहो फोडला. तिचा टाहो बघून गाव गहिवरला.आज पहाटेला रेवंता झाडे यांचा मृतदेह सापडला. ज्या हाताने मुलीला हळद लावायची होती, तीला सजवायच होतं. ते हात थंडगार पडले होते. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

boat drown in riverchandrapur newsgadchiroli newsWainganga riverचंद्रपूर मराठी बातम्यानदीत बोट बुडालीवैनगंगा नदी
Comments (0)
Add Comment