पळणारा नाही लढणारा दादा, राष्ट्रवादीनं लावले बॅनर, रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘मला आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जी कागदपत्रे मागितली ती दिली आणि यापुढेही मी चौकशीला सहकार्य करत राहीन. ईडीची विरोधकांवर कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणूक जवळ आली हे समजते. त्यामुळे डगमगून न जाता ही लढाई मी सुरू ठेवेन आणि ईडीला सामोरा जाईन’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मंगळवारी दिली. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून कुठलाही अनुचित प्रकार करू नये, अशी विनंती पवार यांनी केली.

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनी कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर पवार यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यापार्श्वभूमीवर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव,मुंबईत मोसमातील ‘किमान’ तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार?
‘महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्यामध्ये जे ६४ कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, त्यात माझ्याबरोबरच अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीय आणि आधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पण आता भाजप किंवा फुटीर गटात असलेल्या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. माझी केस अत्यंत साधी सोपी असून त्याविषयीची उत्तरे याआधीही मी दिली आहेत. आता पुन्हा चौकशीतही सहज देईन’, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगेंचा खराडी ते लोणावळा प्रवास, मराठा आरक्षण मोर्चामुळे पुणे शहरात वाहतूक बदल, जाणून घ्या
ईडीची कारवाई ही राजकीय दबावातून होत असल्याची शंका वाटते असे सांगतानाच, विरोधी नेत्यांवर जोरकसपणे कारवाई सुरू झाली की निवडणूक जवळ आली असे समजते, असे वक्तव्यही त्यांनी केले ‘मराठी माणूस नेहमी लढतो, तो कधीही पळून जात नाही, मीही चौकशीपासून पळ काढणार नसून, ताठ मानेने चौकशीला सामोरे जाणार’, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सोन्या-चांदीचे दागिने महागणार, आता मोजावी लागणार जास्तीची किंमत
दरम्यान, रोहित पवार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आलेली आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

baramati agro caseed enquiryncp newsRohit PawarSharad Pawarबारामती अॅग्रोशरद पवार
Comments (0)
Add Comment