म. टा. प्रतिनिधी, येरवडा: ‘सरकारला वाटले मराठे कुठे येणार मुंबईला. पण मराठे बॅगा भरून मुंबईकडे निघाल्यावर सरकारला टेन्शन आले आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या, तरी मुंबईला जाणारच आणि आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी येणार नाही,’ असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सणसवाडीत सांगितले.
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात फुले उधळून स्वागत करण्यात आले. नगरहून निघालेला मोर्चा मंगळवारी रांजणगावात आल्यावर गणपतीचे दर्शन घेऊन ते पुढे निघाले. मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने वाहने आणि हजारो समर्थक आहेत. शिक्रापूरमध्ये आल्यावर नागरिकांनी ढोल-ताशाच्या निनादात आणि पुष्प उधळून त्यांचे स्वागत केले. त्यानतंर रात्री साडेनऊच्या सुमारास जरांगे पाटील यांचा ताफा सणसवाडीत पोहचला. सणसवाडीकरांनी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले. या वेळी जरांगे पाटील यांनी रस्त्यावर वाहनांचा ताफा थांबवून जीपवर चढून शेकडो नागरिकांच्या गराड्यात भाषण केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

रात्री उशिरा जरांगे पाटील शहरात (वाघोली) दाखल झाले. उबाळेनगर येथील एका फार्म हाउसवर ते मुक्काम करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी पुणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आज, बुधवारी सकाळी ते पिंपरीकडे कूच करणार आहेत. या वेळी रस्त्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.