सृष्टीचा जन्म २८ मार्च १९९६ रोजी भोपाळमध्ये झाला. त्यांचे वडील, एक इंजिनीअर आणि आई एक शिक्षिका होत्या. त्यांनीच सृष्टीच्या या प्रवासाचा पाया घातला. सृष्टी यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना दहावीत त्यांना CGPA 10 होता तर, १२ वी मध्ये त्यांना ९३ टक्के गुण मिळवले.
यानंतर सृष्टीने यूपीएससी परीक्षेची तयारी करत इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. सृष्टीने तिच्या कॉलेजच्या दिवसातच UPSC ची तयारी सुरू केली होती आणि कॉलेज सोडल्याबरोबर तिने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी बसल्या आणि पहिल्याच प्रयत्नात देशभरातून ५ वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनल्या.
सृष्टीने २०१८ साली UPSC परीक्षेत ५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, पहिलाच प्रयत्न हा शेवटचा प्रयत्न असेल, असे ठरवून त्यांनी जिद्दीने हे यश मिळवले. त्यांची यशोगाथा आज अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे, योग्य मानसिकता आणि प्रयत्नांनी स्वप्ने सत्यात येऊ शकतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले.
नागरी सेवांमधील त्यांच्या कामगिरीव्यतिरिक्त, सृष्टी एक लेखिका देखील आहे. सृष्टीची सहकारी आयएएस अधिकारी डॉ. नागार्जुन बी गौडा यांच्यासोबतची प्रेमकहाणीही आश्चर्यकारक आहे. सुमारे अडीच वर्षे डेटिंग केल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले. “जिद्दीने आणि मेहनतीच्या जोरावर प्रयत्न केले की यश आपल्यालाच मिळते आणि स्वप्न सत्यातही उतरते.” हे तिने सिद्ध केले.