या आंदोलनाची धग वाढत असून सातारा, कोल्हापूर येथून हाजारोच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.
पावलो-पावली हजारोंच्या संख्येने जमलेला मराठा समाज, वित-वित जागा पुढे जाण्यासाठी मिनिटांचा कालावधी, चौकाचौकात क्रेनला लटकवलेले हार आणि फाटक्यांची आतिषबाजी असे जरांगे पाटील यांचे स्वागत केले जात आहे. लोणावळ्यातील पाचव्या दिवशीचा मुक्काम आटोपून ते आज मुंबईकडे रवाना होणार आहे. नवी मुंबईत त्यांचा आज मुक्काम असणार आहे.
लोणावळ्यातील वाकसई मैदान मराठा बांधवानी भरून गेले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस आंदोलकांची संख्या वाढत आहे.
अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेली गाडी ही मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधवांच्या मुंबई पायी वारीची निशाणी. आज सकाळी ६ वाजता मनोज जरांगे पाटील यांसह त्यांचे लाखो मराठा बांधव वाकसई येथे सभास्थळी दाखल झाले आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आतूर झालेले व रात्रभऱ प्रतिक्षा केलेले मराठा बांधव यांनी एकच जल्लोष केला. दहा वाजता ते मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News