राष्ट्रवादी कोणाची, विधानसभेत सुनावणी; अजितदादा गटातील जुना सहकारी दिसताच सुप्रिया सुळेंनी…

मुंबई : विधानभवनात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची आज उलट तपासणी होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. विधानभवनात प्रवेश करण्याआधी सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार-मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी एकमेकांना हात दाखवून अभिवादन केलं.

विधानभवनात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज पुढील सुनावणी होत आहे. यासाठी शरद पवार गटातून खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित आहेत.

चारवेळा लष्कर भरती परीक्षा फेल, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात यश, मित्रांकडून गावभर मिरवणूक
बाहेरच्या गेटवर अजित पवार गटाचे आमदार-मंत्री अनिल पाटील हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते. तटकरेंच्या आधी गाडीतून सुप्रिया सुळे आल्या. यावेळी दोघांनी एकमेकांना हात दाखवत अभिवादन केलं. त्यानंतर सुप्रिया सुळे विधानभवनात गेल्या. त्यानंतर सुनील तटकरे, अनिल पाटील, शरद पवार आणि रोहित पवारही आत गेले.

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पुरुषाचं आयुष्य, बीडचा हवालदार ललित साळवे झाला ‘बापमाणूस’
रोहित पवार यांची बुधवारी ‘ईडी’ने जवळपास दहा तास चौकशी केली. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संपूर्ण पक्ष रोहित यांच्याशी पाठिशी उभा असल्याचे चित्र बुधवारी दिसले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनावणीसाठी रोहित पवारांसह आजोबा-आत्या उपस्थित होते.

रोहित पवार संघर्ष करणारं नेतृत्व, लोक लढणाऱ्या व्यक्तीसोबत उभं राहतात – रोहित पाटील

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

ajit pawarajit pawar vs sharad pawaranil patilncp mla disqualification caseSharad PawarSupriya Suleअजित पवारअनिल पाटीलशरद पवारसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment