इस्रोमध्ये विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रियेला उरलेत काही दिवस

ISRO Bharti 2024 : तुम्हाला ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतमध्ये तुम्हालाही सामील व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ISRO ने शास्त्रज्ञ, इंजिनीअर, वैद्यकीय अधिकारी, नर्स, ग्रंथालय सहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे असून, या जागांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ज्या तरुणांना या रिक्त पदाचा भाग व्हायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज सबमिट करता येणार आहे. मात्र, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य असणार आहे. १२ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization)

भरली जाणारी विविध पदे :

  • शास्त्रज्ञ/अभियंता SC,
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’,
  • नर्स ‘B’,
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A’

एकूण रिक्त पदे : ४१ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :

  • शास्त्रज्ञ / अभियंता-एससी : ३५ जागा
  • वैद्यकीय अधिकारी-एससी : ०१ जागा
  • नर्स-बी : ०२ जागा
  • ग्रंथालय सहाय्यक-ए : ०३ जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४
वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :

शास्त्रज्ञ / अभियंता SC पदासाठी : पदवीधर

वैद्यकीय अधिकारी ‘SC’ पदासाठी : एमबीबीएस

नर्स ‘B’ पदासाठी :
एसएसएलसी / एसएससी + राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमधील तीन वर्षांच्या कालावधीचा प्रथम श्रेणी डिप्लोमा

ग्रंथालय सहाय्यक ‘A’ पदासाठी :

प्रथम श्रेणीत पदवी + लायब्ररी सायन्स / लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये प्रथम श्रेणीची पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून समकक्ष.

मिळणार एवढा पगार :

शास्त्रज्ञ/अभियंता SC : ८१ हजार ९०६ रुपये
वैद्यकीय अधिकारी ‘SC’: ८१ हजार ९०६ रुपये
नर्स ‘B’: ६५ हजार ५५४ रुपये
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ : ६५ हजार ५५४ रुपये

असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२४ आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

इस्रो भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इस्रो भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

isroisro recruitmentisro recruitment 2024isro recruitment 2024 applicationisro recruitment 2024 apply onlineisro technician recruitmentisro vacancy 2024इस्रो भरतीइस्रो भरती २०२४
Comments (0)
Add Comment