आणखी शिकायचं होतं! मुसळधार पावसात खड्ड्यात वाहून गेली तरुणी, औरंगाबादमध्ये शोककळा

हायलाइट्स:

  • मुसळधार पावसात खड्ड्यात वाहून गेली तरुणी
  • औरंगाबादमध्ये शोककळा
  • नागरिकांनी व्यक्त केला संताप

औरंगाबाद : राज्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आहे. मंगळवारी झालेल्या पावसात मुकुंदनगर येथील दोन मुली वाहून गेल्याची घटना घडली होती. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

ही घटना मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या दोन मुलीपैकी एक मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी बचावली आहे. या प्रकरणाची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली आहे. मृत मुलीचे नाव रूपाली गायकवाड असे आहे. बचाविलेल्या मुलीचे नाव आम्रपाली म्हस्के असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व ठिकाणी पाणी साचलं होतं. रस्त्यांवरही गुडघ्यापर्यंत पाणी होतं. अशातच खड्डा न दिसल्यामुळे तरुणी खड्ड्यात पडली आणि ती थेट २० फुटांपर्यंत वाहत गेली. आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.

भावना गवळींकडून जिवाला धोका; शिवसेना नेत्याच्या आरोपामुळं खळबळ
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती आहे. अशातच पावसाचा अंदाज न आल्यामुळे तरुणीचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खरंतर, मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे रूपालीचा बळी गेल्याची टीका नागरिकांकडून करण्यात आली आहे.

रुपाली ही नोकरी करून शिक्षणही घेत होती. तिच्या घरात आई-वडील, भाऊ, एक मोठी विवाहित बहीण असं कुटुंब आहे. तिने नुकतीच बीसीएची पदवीदेखील मिळवली होती. तिला पुढे शिकायचं होतं. पण या अपघातामुळे तिचा नाहक बळी गेला आहे. सरकारने आधीच लक्ष दिलं असतं, प्रशासनाने पावसाच्या आधी रस्त्यांची दुरावस्था पाहत खड्डे बुजवले असते तर आज ही वेळ आलीच नसती, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्यापासून शहरात संचारबंदी लागू, काय आहेत नियम?

Source link

aurangabad maharashtra rain newsaurangabad maharashtra weatheraurangabad rain newsaurangabad weatheraurangabad weather todayaurangabad weather today hourly
Comments (0)
Add Comment