जे सॅमसंग- अ‍ॅप्पललाही जमलं नाही ती कामगिरी ‘हा’ छोटा ब्रँड करणार; दोन चिपसह येतोय भारतात नवा फोन

iQOO Neo 9 Pro २२ फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. कंपनी गेले अनेक दिवस हा फोन सोशल मीडियाच्या माध्यमातून टीज करत आहे तसेच आज या मोबाइलची लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स देखील अधिकृतपणे घोषित केले आहेत. आयकू इंडियानं सांगितलं आहे की हा स्मार्टफोन पावरफुल मोबाइल चिपसेट Qualcomm Snapdragon 8 Gen 2 सह येईल. त्याचबरोबर Q1 ही सुपर कम्प्युटिंग चिप देखील मिळेल, म्हणजे हा फोन ड्युअल चिप स्मार्टफोन असेल.

iQOO Neo 9 Pro इंडिया लाँच डिटेल

आयकू कंपनी येत्या २२ फेब्रुवारीला भारतात एक मोठ्या इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंटच्या मंचावरून ब्रँडची नवीन ‘नियो’ सीरीज भारतीय बाजारात येईल. कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं आहे की या दिवशी आयकू नियो 9 प्रो भारतात लाँच होईल. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर देखील टेलीकॉस्ट केला जाईल.

iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन

iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन्समध्ये युजर्सना ६.७८ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यावर ९३.४३% स्क्रीन टू बॉडी रेश्यो, २८०० x १२६० पिक्सल रिजॉल्यूशन, एचडीआर १० टेक्नॉलॉजी आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. आयकू नियो ९ प्रो मॉडेलमध्ये कंपनीनं ४ नॅनोमीटर प्रोसेसवर आधारित ऑक्टा कोर Dimensity 9300 चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Immortalis-G720 जीपीयू मिळतो. डिवाइसमध्ये १६ जीबी LPDDR5X रॅम आणी १ टीबी UFS4. 0 इंटरनल स्टोरेज मिळते.

नियो ९ प्रो मॉडेल OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलच्या मुख्य आणि ५० मेगापिक्सलच्या सेकंडरी कॅमेर्‍यासह बाजारात आला आहे. हा फोन २०एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. स्मार्टफोन ५१६० एमएएचची बॅटरी आणि १२०वॉट अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतो. iQOO Neo 9 Pro मॉडेलमध्ये ड्युअल सिम 5G, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय ७, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी सपोर्ट सारखे अनेक फीचर्स आहेत. iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित ओरिजन ओएस ४ वर चालतो.

Source link

iqoo neo 9 proiqoo neo 9 pro indiaiqoo neo 9 pro india launchआयकू नियो ९ प्रोआयकू फोनआयकू मोबाइल
Comments (0)
Add Comment