आझाद मैदानात मराठा आंदोलनाची तयारी थांबविण्याचे आदेश; विरेंद्र पवार यांना पोलिसांची नोटीस

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करत सरकार विरोधात एल्गार उगारला आहे. यासाठी ते मुंबईत येत आहेत. मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तयारीही सुरू आहे. मात्र याला आता पोलिसांनी मनाई केली आहे. आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चातर्फे सुरु असलेली तयारी थांबविण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत.
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, नाही तर मरणाला अर्थ राहणार नाही; आणखी एका तरूणाने संपवली जीवन यात्रा!
याबाबत विरेंद्र पवार यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चा आता न्यायालयात जाणार आहे. याविरोधात विरेंद्र पवार याचिका दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची मनाई केली आहे. तसेच पोलिसांनी मनोज जरांगेंना खारघरमधील जागेचा पर्याय दिला आहे.

एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठ आंदोलन पुकारलं आहे. मुंबईमध्ये लाखोंचा समुदाय घेऊन जरांगे पाटील आरक्षण मिळावे, यासाठी सरकारकडे मागणी करणार आहेत.

Source link

manoj jarange newsmaratha movement newsmaratha reservation newsmaratha society newsमनोज जरांगे बातमीमराठा आंदोलन बातमीमराठा आरक्षण बातमीमराठा समाज बातमी
Comments (0)
Add Comment