हायलाइट्स:
- सचिन वाझेसोबत CCTV मधली ‘ती’ महिला कोण?
- NIA ने केला धक्कादायक खुलासा
- दिसणाऱ्या महिलेचाही आरोपपत्रात उल्लेख
मुंबई : मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दीर्घ तपासानंतर दाखल केलेल्या आरोपपत्रात एनआयएने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. स्फोटकं असलेली एसयूव्ही ताब्यात घेण्यापूर्वी सचिन वाझे यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडताना दिसणाऱ्या महिलेचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.
एनआयएच्या आरोपपत्रानुसार, महिला सचिन वाझे यांच्यासह पंचतारांकित हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजवरून याची पुष्टी करण्यात आली आहे. त्या महिलेबद्दल अधिक माहिती गोळा केली असता ती एक एस्कॉर्ट होती, जी त्याच हॉटेलमध्ये काम करायची. २०११ मध्ये ती एका दलालामार्फत वाझे यांना भेटली होती. त्या महिलेला भेटल्यानंतरच वाझे यांनी एसयूव्ही मुकेश अंबानींच्या घराबाहेर उभी केली होती. या महिलेची विधानेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत.
परमबीर सिंगच्या भूमिकेवरही शंका
अँटिलिया जिलेटिन प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. पण आता मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे यामध्ये आरोपी म्हणून नाव नाही. पण एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात परमबीर सिंह यांची भूमिकाही प्रश्नचिन्हात आहे.
खुनाच्या दिवशी परमबीर सिंगला तीन वेळा भेटले
एनआयएने सादर केलेल्या आरोपपत्रात लिहिलं आहे की, ४ मार्च रोजी ज्या दिवशी हिरेन मनसुखला ठार करण्यात आलं, त्या दिवशी सचिन वाझे तीन वेळा परमबीर सिंगला भेटला. सचिन वाझे याने सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत मुंबई सीपीला भेटले, नंतर दुपारी ३.३० ते ५.३० आणि त्यानंतर संध्याकाळी ७ ते ७.३० लाही त्याने भेट घेतली.