हायलाइट्स:
- नागपुरात शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
- कारण वाचून हादराल
- नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भंडारा : भंडारा जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे अनेक साथीच्या आजाराने डोके वर काढले असून जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत. आतापर्यंत २० डेंग्यूच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर लाखनी तालुक्यातील रेंगेपार/ कोहळी येथील नागपूर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षिय विद्यार्थीनीचा डेंग्यूने बळी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा शहारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता आतापर्यत जिल्ह्यात डेंग्यूने पाच बळी घेतले आहे. सद्धा जिल्ह्यात ४२५ लोकांची तपासणी केली असून २० रुग्ण हे डेंग्यू पोझिटीव्ह निघाले आहे. यामुळे भंडारा जिल्हा प्रशासनाची डेंग्यू रोखण्यासाठी दमछाक होत असून आधी करोना आता डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
‘…तोपर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही?’
दरम्यान, करोनारुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांनादेखील सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील महत्त्वाची बैठक नुकतीच झाली असून या दोन्ही यंत्रणांमधील समन्वयक समितीने खासगी रुग्णालायंमधील करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.
‘करोनास प्रतिबंध करण्यासाठी खासगी रुग्णालयांमधील पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आहे. औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा योग्यप्रकारे व्हावा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून सध्या औषधे, ऑक्सिजनचा किती साठा आहे याचीही माहिती घेण्यात आली आहे. रुग्णसंख्येमध्ये ज्या प्रमाणात वाढ होईल त्यादृष्टीने औषधांची तसेच इतर बाबींची उपलब्धता ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती या समितीचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.